हाच पगार कर्मचाऱ्याने आश्चर्यचकित होत, त्याविषयी विचारलं. त्यावर हाच तुझा पगार आहे, असं उत्तर बॉसनं दिलं. दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारा पगार यावेळी बादलीत कसा काय जमा झाला, असा प्रश्न कर्मचाऱ्याला पडला. त्याच्या पगाराच्या रकमेइतकीच नाणी त्याच्या बॉसने एका बादलीत भरली आणि ती बादली पगार म्हणून कर्मचाऱ्याला दिली. एवढी वजनदार बादली उचलून घरी जाताना त्याला अक्षरशः घाम फुटला आणि आपली नोकरी ‘जड पगाराची’ असल्याची मजादेखील वाटली. हॉटेल कर्मचाऱ्याने ट्विट केला फोटो आयर्लंडमधील डब्लिन शहरात राहणाऱ्या रियाननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्या मालकानं पाहा आपल्याला कसा पगार दिला, असं म्हणत त्यानं ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.If anyone wants to know what it was like to work in alfies on south william street just know after chasing my last pay for weeks I finally got it but in a bucket of 5c coins. pic.twitter.com/otKhikIU5q
— Rian Keogh (@rianjkeogh) September 14, 2021