मराठी बातम्या /बातम्या /Viral /पुस्तकांचं अजब दुकान; इथे पुस्तकांबरोबर असतात मांजरी!

पुस्तकांचं अजब दुकान; इथे पुस्तकांबरोबर असतात मांजरी!

फ्रान्समधील आएक्स-एन-प्रोव्हन्स (Aix-en-Provence) या शहरात या वर्षी जूनमध्ये हे मोन चॅट पितरे (Mon Chat Pitre) नावाचे पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इथं सर्वात खास गोष्ट आहे ती म्हणजे या दुकानात 6 मांजरी आहेत.

फ्रान्समधील आएक्स-एन-प्रोव्हन्स (Aix-en-Provence) या शहरात या वर्षी जूनमध्ये हे मोन चॅट पितरे (Mon Chat Pitre) नावाचे पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इथं सर्वात खास गोष्ट आहे ती म्हणजे या दुकानात 6 मांजरी आहेत.

फ्रान्समधील आएक्स-एन-प्रोव्हन्स (Aix-en-Provence) या शहरात या वर्षी जूनमध्ये हे मोन चॅट पितरे (Mon Chat Pitre) नावाचे पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इथं सर्वात खास गोष्ट आहे ती म्हणजे या दुकानात 6 मांजरी आहेत.

  नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : जगात पाळीव प्राणी पाळणाऱ्यांची (Pet Animal Lovers) संख्या मोठी आहे. अनेक लोक मांजर, कुत्रा, घोडा, ससा, कबुतर, कोंबड्या असे विविध पक्षी, प्राणी पाळतात. मात्र मांजर (Cat) आणि कुत्रा (Dog) पाळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. माणसाचा ताणतणाव दूर करण्यात हे प्राणी अतिशय म्हत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच लोक या प्राण्यांचे संगोपन करतात. हे मुके प्राणीही माणसांना जीव लावतात. कुत्रा हा तर अगदी विश्वासू प्राणी म्हणून ओळखला जातो. दिसायला अतिशय गोजिरवाणी असलेली मांजरंही बहुतांश लोकांना आवडतात. मात्र अनेकदा काही कारणांमुळे लोक घरात असे प्राणी पाळू शकत नाहीत. अशा लोकांसाठी विशेषतः मांजरप्रेमींसाठी फ्रान्समध्ये एक अतिशय अनोखे दुकान सुरू करण्यात आलं आहे. खरंतर हे दुकान पुस्तकांचं (Bookstore for Cat Lovers in France) आहे; पण इथं मांजरीही आहेत. त्यामुळे इथं येणारे लोक पुस्तकं वाचू शकतात आणि मांजरांसोबत वेळ घालवू शकतात.

  फ्रान्समधील आएक्स-एन-प्रोव्हन्स (Aix-en-Provence) या शहरात या वर्षी जूनमध्ये हे मोन चॅट पितरे (Mon Chat Pitre) नावाचे पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इतर सर्वसामान्य पुस्तकांच्या दुकानाप्रमाणे हे दुकान पुस्तकांनी भरलेले आहे, परंतु इथं सर्वात खास गोष्ट आहे ती म्हणजे या दुकानात 6 मांजरी आहेत. त्यामुळे मांजर प्रेमींसाठी हे पुस्तकांचे दुकान अगदी आवडती जागा ठरली आहे. अवघ्या 5 महिन्यांत हे पुस्तकांचे दुकान फ्रान्समध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. लोक इथं केवळ पुस्तकं वाचण्यासाठीच येत नाहीत तर मांजरींसोबत वेळ घालवण्यासाठीही येतात. काही लोक तर पुस्तकं वाचण्यापेक्षा मांजरींसाठीच येतात.

  So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते

  या शहरातील एक पत्रकार दाम्पत्य सोलीन चावाने (Solène Chavanne) आणि जीन-फिलिप डॉक्स (Jean-Philippe Doux) यांनी हे पुस्तकांचे दुकान सुरू केलं आहे. लोकांनी त्याच्या पुस्तकांच्या दुकानात येऊन आरामात पुस्तके वाचावीत आणि मांजरींसोबत वेळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती.

  उतावळा नवरदेव! स्टेजवरच आऊट ऑफ कंट्रोल झाला वर; ते कृत्य पाहून नवरीही लाजली, VIDEO

  या मांजरींनाही आता इथं येणाऱ्या लोकांची सवय झाली आहे. तरीही त्यांना माणसांमध्ये राहून कंटाळा आला तर त्या दुकानाच्या मागे असलेल्या एका खास ठिकाणी जातात. इथं या मांजरींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिथं त्यांच्या जेवणाची, झोपेची सोय करण्यात आली असून, त्यांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. दुकानात येणाऱ्या लोकांना मांजरींच्या खास जागी जाण्यास मनाई आहे.

  First published:

  Tags: Cat, Pet animal