मॉस्को, 18 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक निळा रंगाचा साप दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून या सापाला जगातील सर्वात सुंदर साप असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये हा साप एका लाल रंगाच्या गुलाबावर बसलेला दिसून येत आहेत.
या सापाचे नाव ब्लू पिट व्हाइपर असून हा दिसायला सुंदर असला तरी हा साप सर्वात भयंकर आहे. खरं तर हा एक प्राणघातक साप आहे, ज्याच्या विषामुळे भीषण रक्तस्त्राव होतो. मॉस्को प्राणिसंग्रहालयाच्या मते हा साप पांढरा आयलँडच्या पिट व्हाइपर निळा प्रकार आहे. हा साप इंडोनेशिया आणि पूर्व तैमोरमध्ये भागात आढळून येतो. बहुतेककरून हा साप दुर्मिळ असून हिरव्या रंगाचा असतो.
वाचा-कुत्रा-मांजर नाही तर थेट बैलालाच बाईकवर डबलसीट नेलं; विश्वास बसत नाही पाहा VIDEO
The incredibly beautiful Blue Pit Viper pic.twitter.com/zBSIs0cs2t
— Life on Earth (@planetpng) September 17, 2020
वाचा-आता हद्दच झाली! Tiktok फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीच्या मृत्यूचा बनवला फेक व्हिडीओ
'लाइफ ऑन अर्थ' या ट्विटर अकाऊंटवर या ब्लू पिट व्हाइपरचा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मॉस्को प्राणिसंग्रहालयाचे संचालक स्वेतलाना अकुलोवा म्हणाले की, "विशेष म्हणजे, निळ्या सापांची जोडी हिरव्यागार बाळांना जन्म देऊ शकते. पांढर्या रंगाच्या व्हाइपरला विविपॅरेस असे म्हणतात.
वाचा-पुलावरून थेट बाईकसह नदीत बुडालं कुटुंब, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 17 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत 2.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.