नवी दिल्ली 01 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रँक व्हिडिओंना (Prank Video) नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळते. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की अपलोड होताच सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) होतात. मात्र कधीकधी मस्करीच्या नावाखाली लोकांना त्रास देणाऱ्या प्रँकस्टर्सला याच्या परिणामालाही सामोरे जावं लागतं. नुकतंच एका टॅक्सी चालकासोबत प्रँक (Prank With Taxi Driver) करणं व्हिडिओ ब्लॉगर्सला महागात पडलं. या प्रकरणात ब्लॉगर्सला तुरुंगवासाची शिक्षा सुनवाण्यात आली. ही घटना २०२१च्या सुरुवातीची आहे. मात्र आता ब्लॉगर्सला शिक्षा सुनावण्यात आली. प्रँकची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रशियाचे फेमस प्रँकस्टर्स डमशिबे, टुसुपॉव आणि कॅसानोवा यांनी उबरप्रमाणेच एका पायव्हेट कॅबवाल्यासोबतही प्रँक करण्याचा प्लॅन बनवला. प्रँक असा होता की ते या व्यक्तीची कार घेऊन पळणार, ड्रायव्हरला वाटणार की त्याची कार चोरी झाली आहे. मात्र हे पूर्ण प्रकरण वेगळ्याच दिशेला गेलं. या लोकांनी विचारही केला नव्हता की प्रँक त्यांना भलताच महागात पडेल. तिन्ही प्रँकस्टर्स प्रवाशी बनून प्रायव्हेट कारमध्ये बसले. यानंतर यातील एकाने ड्रायव्हरला म्हटलं की सामान डिक्कीमध्ये ठेवण्यासाठी माझी मदत कर. ड्रायव्हर डिक्कीमध्ये सामान ठेवण्यासाठी जाताच दुसरा प्रँकस्टर ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी घेऊन निघून जातो.
A court in Moscow has sentenced three bloggers to three-and-a-half years behind bars on charges of car theft following a practical joke that involved stealing a taxi while the driver was loading luggage into the trunk.https://t.co/dHqvPYQtJPpic.twitter.com/YTfhJhYJk2
— Bryan MacDonald (@27khv) November 27, 2021
प्लॅननुसार या तिघांनाही ठरवलं होतं काही वेळात ड्रायव्हरला त्याची कार परत आणून द्यायची आणि सांगायचं की आम्ही प्रँक करत होतो. मात्र याआधीच ड्रायव्हरने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर प्रँक करणाऱ्या ब्लॉगर्सला चोरीच्या आरोपात अटक झाली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. यात तिघांनाही दोषी ठरवत तीन वर्ष सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
जजने आपला निर्णय सुनावताना म्हटलं की कॅब ड्रायव्हरसोबत केलेली ही मस्करी अतिशय चुकीची होती. यामुळे या प्रकरणात दोषी ठरवत तिघांनाही ३ वर्ष सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याआधीही कॅसानोवा विवादात आला होता. मार्च महिन्यात त्याने आपण कोरोनाबाधित असल्याचं सांगत प्रँक केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.