मराठी बातम्या /बातम्या /Viral /व्वा काय Jugaad आहे! सायकलचा पँडल मारला आणि Juice तयार; कसं ते तुम्हीच पाहा Video

व्वा काय Jugaad आहे! सायकलचा पँडल मारला आणि Juice तयार; कसं ते तुम्हीच पाहा Video

या व्हायरल व्हिडिओतल्या दुकानात ग्राहकांना स्वत:लाच ज्यूस तयार करून प्यावा लागतो.

या व्हायरल व्हिडिओतल्या दुकानात ग्राहकांना स्वत:लाच ज्यूस तयार करून प्यावा लागतो.

या व्हायरल व्हिडिओतल्या दुकानात ग्राहकांना स्वत:लाच ज्यूस तयार करून प्यावा लागतो.

    मुंबई, 25 डिसेंबर :  ज्युसचं दुकान म्हटलं, की इलेक्ट्रिक ब्लेंडरचा (Electric blender) वापर करून फळांपासून ज्यूस काढणारा दुकानदार आपल्या डोळ्यांसमोर येतो. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात चक्क सायकलने ज्युस (Juice blender on cycle) काढला जातो आहे. सोशल मीडियावर या ज्युसच्या दुकानाचा (Juice shop) व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाला आहे.

    या व्हायरल व्हिडिओतल्या दुकानात ग्राहकांना स्वत:लाच ज्यूस तयार करून प्यावा लागतो. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सायकलवर बसलेली दिसत आहे. सायकलच्या समोर एक ब्लेंडर लावलेला आहे. ती व्यक्ती जेव्हा सायकल चालवते तेव्हा ब्लेंडर काम करण्यास सुरुवात करतो आणि त्यात असलेल्या कलिंगडाचा ज्यूस (Watermelon juice) तयार होतो. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे, की 'Someone with full energy and one who has a big role to play in where we stand.'

    View this post on Instagram

    A post shared by Greenobar (@thegreenobar)

    हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून एक कोटीहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर युझर्सनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने ही चांगली संकल्पना असल्याची कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे, की 'दोन फायदे एकत्र.' ही कल्पना कुणी सत्यात उतरवली आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही; मात्र सायकलवरच्या फिरत्या ज्यूस दुकानाच्या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे. या व्हिडिओपासून अनेकांना प्रेरणादेखील मिळू शकते.

    हे वाचा - So cute! रस्ता ओलांडताना हत्तीने केला 'गोड इशारा'; VIDEO ने वेधलं सर्वांचं लक्ष

    सोशल मीडिया साइट्सवर अनेकदा अनोखे व्हिडिओज पहायला मिळतात. काही व्हिडिओ गमतीशीर असतात, तर काही व्हिडिओ लोकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारे असतात. असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होऊन ट्रेंडिंग (trending) लिस्टमध्ये एकदम टॉपलासुद्धा राहतात. विशेषत: खाण्या-पिण्याबाबतच्या व्हिडिओजना (Food Videos) लोकांची जास्त पसंती मिळते. अशाच व्हिडीओपैकी या ज्युसच्या दुकानाचा व्हिडीओ आहे.

    First published:
    top videos

      Tags: Food, Viral, Viral videos