मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! हे काय? एक घोट घेताच पार्श्‍वभागाखाली झाला ब्लास्ट; VIDEO VIRAL

अरे बापरे! हे काय? एक घोट घेताच पार्श्‍वभागाखाली झाला ब्लास्ट; VIDEO VIRAL

ड्रिंक घेताच ब्लास्ट झाला आणि तरुण हवेतच उडाला.

ड्रिंक घेताच ब्लास्ट झाला आणि तरुण हवेतच उडाला.

ड्रिंक घेताच ब्लास्ट झाला आणि तरुण हवेतच उडाला.

मुंबई, 26 नोव्हेंबर : जास्त दारू प्यायल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना तुम्ही विचित्र वागताना पाहिलं असेल. नशा चढल्यानं त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे चालताना त्यांचा तोल ढासळतो, नीट बोलतानाही येत नाही. तर कोल्ड ड्रिंकचाही पहिला घोट घेताच अगदी तोंड आणि डोकंही सुन्न होतं. डोळ्यासमोर एकदम तारेच दिसू लागतात. पण कधी काही प्यायल्यानंतर (Blast after man drinking) पार्श्वभागाखाली ब्लास्ट (Blast under buttock) झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?

एका व्यक्तीसोबत असंच विचित्र घडलं (Blast on chair). या व्यक्तीने एक घोट घेतला तसा त्याच्या पार्श्वभागाखाली जोरदार ब्लास्ट झाला (Blast video). ब्लास्टमुळे ही व्यक्ती हवेतच उडाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. व्हिडीओ पाहून धक्काही बसेल आणि हसूनही आवरणार नाही (funny video). शॉकिंग पण फनी असाच हा व्हिडीओ आहे. इतकं वाचल्यानंतर आता नेमकं असं या व्यक्तीसोबत काय घडलं हे जाणून घेण्याची किंवा पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण एका खुर्चीत निवांत बसला आहे. त्याच्या एका हातात कोणत्या तरी पेयाचं कॅन आहे. हे कॅन तो आपल्या तोंडाला लावतो. कॅनमधून फक्त एक घोट पितो आणि दुसऱ्याच क्षणी तो ज्या खुर्चीवर बसला आहे, त्या खुर्चीवर ब्लास्ट होतो. तरुणाच्या पार्श्वभागाखाली ब्लास्ट झाल्याने तरुण उंच हवेत उडून आडवा पाडतो. खुर्चीही आडवी होते. नेमकं काय घडलं हे तरुणालाही समजलं नाही.

हे वाचा - हिला डाला रे बाबा! एक घोट घेताच माकडाला डोळ्यांसमोर दिसले तारे; पाहा Funny Video

बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos