पाण्यात उडी मारुन ब्लॅक पँथरने अॅनाकाॅन्डावर केला Attack; जबड्यात पकडून खेचलं आणि...पाहा VIDEO

पाण्यात उडी मारुन ब्लॅक पँथरने अॅनाकाॅन्डावर केला Attack; जबड्यात पकडून खेचलं आणि...पाहा VIDEO

अत्यंत थरारक असा हा अंगावर काटा उभा करणारा VIDEO...

  • Share this:

एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा (Social Media) व्हायरल झाला (Viral Video) आहे. एक ब्लॅक पँथर आणि एनाकॉन्डामध्ये भयंकर लढाई सुरू असल्याचे दिसते. (Black Panther Vs Anaconda) बोआ जातीतील आणि दक्षिण अमेरिकेतील हिरवा एनाकोंडा जगभरात सर्वात मोठा साप आहे. यादरम्यान ब्लॅक पँथर अमेरिकेतील सर्वात शक्तीशाली जंगली प्राणी आहे. (Black Panther jumps into water and attacks Anaconda) जेव्हा हे शक्तीशाली एकमेकांविरोधात लढतात, तेव्हा काय होतं? एक भयंकर युद्ध..या युद्धात प्रत्येत प्राणी समोरच्याला मारण्याचा प्रयत्न करीत असतो. यासाठी केवळ तो योग्य जागा शोधत असतो.

या व्हिडीओमध्ये एक मेलेनिस्टिक जॅग्वार, ज्याला ब्लॅक पँथरही म्हटले जाते, तो विशाल एनाकोंडाला पाण्याच्या बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसतो. हा एनाकोंडा जगातील सर्वात मोठा आणि वजनदार सापांपैकी एक आहे. याचं वजन 130 किलोपर्यंत असू शकतं. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ते पाण्यात लढाई करीत आहे. ब्लॅक पँथर एनाकोंडाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. एनाकोंडा पाण्यात खूप सक्रीय असतो, मात्र जमिनीवर त्याची गती मंदावते. यामुळे एनाकोंडा सर्वसाधारणपणे पाण्याच्या जवळपास आढळतो. (Black Panther jumps into water and attacks Anaconda)

हे ही वाचा-फ्रँकीमध्ये खायला मेलेल्या उंदराचं पिल्लू; VIDEO VIRAL झाल्यानंतर प्रशासनाला जाग

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ब्लॅक पँथर पाण्यात उडी मारुन एनाकाँडावर अटॅक करीत आहे. तो एनाकॉंला बाहेर जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. एनाकाँडा आणि जॅग्वार याच्यामधील लढाईचा हा व्हिडीओ 2013 पासून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे. माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्विटरवर पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 12, 2021, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading