मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ना ब्रश, ना हँडग्लोव्ह्ज; भाजप खासदाराने स्वतःच्या हातानेच स्वच्छ केलं शाळेचं टॉयलेट; VIDEO VIRAL

ना ब्रश, ना हँडग्लोव्ह्ज; भाजप खासदाराने स्वतःच्या हातानेच स्वच्छ केलं शाळेचं टॉयलेट; VIDEO VIRAL

भाजप खासदार टॉयलेट स्वच्छ करताना.

भाजप खासदार टॉयलेट स्वच्छ करताना.

हातांनीच टॉयलेट स्वच्छ करणाऱ्या भाजप खासदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

भोपाळ, 23 सप्टेंबर : सध्या एका भाजप खासदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे खासदार चक्क घाणेरडं टॉयलेट स्वच्छ करताना दिसले. धक्कादायक म्हणजे या खासदाराने ना हातात ब्रश घेतलं आहे, ना ग्लोव्ह्स घातले आहेत. असंच आपल्या हातांनीच त्यांनी टॉयलेट स्वच्छ केलं आहे. शाळेत शौचायल स्वच्छ करतानाचा त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टॉयलेट स्वच्छ करणारे हे खासदार आहेत जनार्दन मिश्रा. वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत राहणारे मध्य प्रदेशमधील खासदार जनार्दन मिश्रा. रिवातील एका शाळेत गेले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवसापासून सेवा पंधरवडा राबवला जातो आहे. याच निमित्ताने त्यांनी शाळेला भेट दिली. तिथं त्यांनी वृक्षारोपण केलं. शाळेत फिरत असताना त्यांना अस्वच्छ टॉयलेट दिसलं. जे पाहताच त्यांनी स्वतःच कंबर कसली आणि टॉयलेट स्वच्छ करायला घेतलं. पण टॉयलेट साफ करण्यासाठी ना त्यांच्याजवळ ब्रश होतं, ना त्यांनी हँड ग्लोव्ह्ज घातले होते. हातांनीच ते टॉयलेट स्वच्छ करताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यांनी स्वतः आपल्या @Janardan_BJP अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपला हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पंतप्रधान मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष वीडी शर्मा आणि हितानंद शर्मा यांना टॅग केला आहे. दरम्यान टॉयलेट स्वच्छ करण्याची ही जनार्दन यांची पहिली वेळ नाही. त्यांनी याआधीही सहा वेळा टॉयलेट स्वच्छ करून आपला असा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याशिवाय कचरा उचलताना, टेबल साफ करतानाचेही त्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. याशिवाय आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांसाठीही ते कायम चर्चेत असतात.
First published:

Tags: Viral

पुढील बातम्या