Home /News /viral /

केक की पैशांचं एटीएम; BIRTHDAY गिफ्टचा VIDEO पाहून तुम्हीही व्हाल सरप्राइझ

केक की पैशांचं एटीएम; BIRTHDAY गिफ्टचा VIDEO पाहून तुम्हीही व्हाल सरप्राइझ

व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाला मला असाच बर्थ डे केक सरप्राइझ गिफ्ट म्हणून हवा.

    मुंबई, 02 ऑगस्ट: बर्थ डे (Birthday) आणि त्यादिवशी मिळणारं सरप्राइझ तसं काही आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या वाढदिवशी आपल्या आपल्या कुटुंबाकडून, मित्र-मैत्रिणींकडून भरपूर सरप्राइझ गिफ्ट मिळतात. कुणी केक आणतं, कुणी आपल्याला अपेक्षित नसेल असं गिफ्ट देतं. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये बर्थ डे केक (Birthday cake)  सरप्राइझ गिफ्टची चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल बर्थ डे केक यामध्ये काय सरप्राइज आहेत. ते तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल. व्हिडीओमधील ही व्यक्ती केकवरील टॉपर उचलते तेव्हा त्या व्यक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसतो. कारण त्याला पैशांच्या नोटा मिळतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही दिसेल की टॉपर उचलताच त्या व्यक्तीच्या हातात प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या पैशांच्या नोटा येतात. बरं एक, दोन, तीन, चार, पाच नव्हे तर भरपूर नोटा असलेलं संपूर्ण नोटांचं बंडलच या केकमध्ये असतं. जणू हा केक नाही तर पैशांचं एटीएमच आहे आणि त्यातून भरमसाठ पैसे येतंच आहेत. हे वाचा - ...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL एका ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने आपल्या वडीलांच्या वाढदिवशी हा खास बर्थ डे केक तयार केला होता. आपल्या वडिलांना त्यांच्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून पैसेच हवेत असतात. यावेळी मी, माझी बहीण आणि आईने त्यांना वेगळ्या प्रकारे हे पैसे देऊन सरप्राइज करण्याचं ठरवलं, असं या ट्वीटमध्ये या मुलीनं म्हटलं आहे आणि या मुलीने केकमध्ये भरपूर पैसे ठेवत आपल्या वडीलांना वाढदिवसाचं हे अनोखं असं सरप्राइझ गिफ्ट दिलं. हे पाहिल्यानंतर तिचे वडील इतके आनंदी झाले आणि ते नाचायलाच लागलेत. त्यांचा हा आनंददेखील पाहण्यासारखा आहे. हे वाचा - कशाला हव्यात महागड्या मशीन! भाज्या सॅनिटाइझ करण्यासाठी इंडियन जुगाड; पाहा VIDEO सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर हजारो युझर्सनी रिट्वीट केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या युझर्सनी हा केक तयार करणाऱ्या मुलीला आणि तिच्या आईचंही कौतुक केलं आहे आणि त्यांच्या मेहनतीलाही दाद दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral videos

    पुढील बातम्या