VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाइक करत असून यासोबतच चिमणीच्या साहसाचंही कौतुक केलं जात आहे.

  • Share this:

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आई आणि बाळाचं काय  नातं असतं याचा अनुभव घेता येईल. व्हिडीओमध्ये दोन कावळे चिमणीच्या पिल्लावर चोचीने हल्ला करतात. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती चिमणी आपल्या प्राणांची पर्वा न करता दोन कावळ्यांशी भांडते आणि आपल्या पिल्लाला वाचवते. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाइक करत असून यासोबतच चिमणीच्या साहसाचंही कौतुक केलं जात आहे.

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका कावळ्याने चिमणीच्या पिल्लाला आपल्या पायात घट्ट पकडलंय तर दुसरा कावळा चिमणीच्या पिल्लाकडे एक टक पाहत आहे. याआधी की कावळा पिल्लावर हल्ला करून त्याला मारून टाकेल तेवढ्यात पिल्लाची आई येते आणि दोन्ही कावळ्यांवर हल्ला करत त्यांच्या तावडीतून पिल्लाला सोडवते.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. आतापर्यंत 80 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 8 हजार युजर्सने लाइक केला आहे. तर 3 हजार लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला की, त्यांनी रि-ट्वीटही केला. एक छोटीशी चिमणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी अजिबात घाबरली नाही आणि तिने आपल्या पिल्लाचा जीव वाचवला.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या