मुंबई, 03 मे : माणूस जसा बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो तसं प्राणी करू शकत नाहीत. कारण त्यांना बोलताच येत नाही. शब्दांची भाषा न येणारे हे मुके जीव प्रेम, निष्ठा आणि संवेदनशीलता याबाबत मात्र माणसापेक्षा दोन पावलं पुढंच असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे अनेक किस्सेही आपण ऐकत आलो आहोत. माणूस जितकं प्रेम प्राण्यांवर करतो त्याच्या कितीतरी अधिक पट प्रेम प्राणी मालकावर करतात. आपल्या मालकाच्या विरहात आपले प्राण त्यागणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या प्राण्यांच्या सत्यकथा आपण अनेकदा ऐकत असतो. अशाच एका मुक्या जीवाच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या प्रिय साथीदाराला गमावण्याचं दुःख होतंच. अशाच आपल्या साथीदाराला गमावणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. साथीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ बसून रडणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. हा व्हिडीओ जुना आहे. पण तो आता पुन्हा व्हायरल होतो आहे.
हे वाचा - कसं शक्य आहे? माणसाने स्पर्श करताच 'मृत' झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर हे दोन पक्षी आहेत. त्यातील एक मृत आहे. जिवंत पक्षी आपल्या या जमिनीवर पडलेल्या साथीदाराकडे जातो. त्याला आपल्या चोचीने उठवण्याचा प्रयत्न करतो. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने, तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अनेक प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा तो उठत नाही, तेव्हा त्याची खात्री पटते की तो जिवंत नाही. त्याचा जोडीदार या जगात नाही यावर त्याचा जणू विश्वासच बसत नाही आहे, असं त्याची ती कृती बघून वाटतं.
नंतर अनेक पक्षी तिथं जमलेले दिसतात. आपल्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले दिसत असून, जणू माणसांप्रमाणे तेही शोकसभा घेत आहेत, असं हे दृश्य बघून वाटतं. या पक्ष्यांचं आपापसातलं प्रेम, विरहानं व्याकुळ झालेल्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप मन हेलावून टाकतं.
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी गेल्या वर्षी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, जोडीदाराच्या मृत्यूनं दु: खी झालेला हा पक्षी आहे. आपल्या मित्राला, सहकाऱ्याला शेवटचा निरोप देण्याची त्यांची ही तगमग अनेकांना हेलावून टाकणारी आहे.
हे वाचा - Pushpa च्या श्रीवल्लीचेही ठुमके विसराल; Saami Saami गाण्यावर आजीबाईचा जबरदस्त Dance video
सुशांत यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा ऑस्ट्रेलियन गालाह (Australian Galah) नावाचा पक्षी आहे. पिंक आणि ग्रे कॉकॅटोदेखील (Cokatoo) म्हटले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.