• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • चोचीत ड्रोन धरून आकाशात फडफडत राहिला पक्षी आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

चोचीत ड्रोन धरून आकाशात फडफडत राहिला पक्षी आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

पक्ष्याने ड्रोनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण...

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वीच एका मगरीने ड्रोनवर हल्ला (Attack on drone) केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता असाच ड्रोनवर अटॅक करणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ (Bird attack on drone video) समोर आला आहे. आकाशात ड्रोन दिसताच पक्षी ड्रोनजवळ गेला आणि त्याने चोचीत धरलं. पक्ष्याने (Bird video) ड्रोनवर (Drone video) केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. आकाशातून उडणारं विमान आता पक्ष्यांसाठी नवीन नाही. पण ड्रोन मात्र त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यामुळे आकाशात असं काही तरी वेगळं दिसताच पक्षीसुद्धा त्याच्या जवळ जातात. असाच प्रयत्न या पक्ष्याने केला पण पुढे काय घडलं ते व्हिडीओत पाहा. आकाशात ड्रोन पाहून पक्षी ड्रोनजवळ जातो आणि ड्रोनला चोचीने मारतो. ड्रोन चोचीत धरण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ तो ड्रोनवर हल्ला करत राहतो. पण हे असं काही तरी आहे जे चोचीत येत नाही आहे किंवा त्याला काहीच होत नाही आहे असं समजताच तो तिथून गुपचूप निघून जातो. हे वाचा - अरे बापरे! माकडासमोर जाऊन केलं पाऊट; तरुणीसोबत जे घडलं ते पाहून हादराल; Video Viral माहितीनुसार हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील आहे. फूड डिलिव्हरी करणारं हे ड्रोन आहे. काही देशांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फूड डिलीव्हरी केली जाते आहे त्यात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. फूड डिलिव्हरी करणारं ड्रोन जेव्हा ग्राहकाजवळ पोहोचलं त्याचवेळी या कावळ्याने ड्रोनवर हल्ला केला आणि मग आपल्या ऑर्डरची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकाने हे सर्व दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे वाचा - चवताळलेली मगर पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली आणि...; धडकी भरवणारा VIDEO काही दिवसांपूर्वी असाच ड्रोनवर हल्ला करणाऱ्या एका मगरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर insta.mandeers नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका नदीमध्ये अनेक मगरी आहेत. इतक्यात तिथं एक ड्रोन येतं. यानंतर यातील एक मगर पाण्यातून बाहेर येते आणि ड्रोनलाच आपलं शिकार बनवण्यासाठी प्रयत्न करू लागते. इतक्यात ड्रोन मागे जातं आणि मगरीला हार मानावी लागते.
  Published by:Priya Lad
  First published: