मराठी बातम्या /बातम्या /Viral /Bill Gates ला ही शक्य नाही, ते काम भारतीय काही सेकंदात करतात.... Video ची सोशल मीडियावर चर्चा

Bill Gates ला ही शक्य नाही, ते काम भारतीय काही सेकंदात करतात.... Video ची सोशल मीडियावर चर्चा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

जास्त विचार करु नका तुम्ही हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला सगळं काही लक्षात येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 03 फेब्रुवारी : चपाती-भाजी हे भारतीयांचं रोजचं अन्न आहे. आपण ते दररोज खातो. तसे पाहाता भारताच्या काही भागात चपाती, रोटी, भाकरी, पराठा असा वेगवेगळा प्रकार बनवला जातो. हे सगळे प्रकार गहू पासून बनतात. पण हे सगळं आपल्या भारतीयांसाठी ठीक आहे आपल्याला त्यात वेगळं असं काहीच वाटत नाही.

पण विचार करा की हेच बनवण्याची किंवा खाण्याची वेळ जेव्हा परदेशी व्यक्तीवर येते तेव्हा? त्याचं काय होत असेल....

जास्त विचार करु नका तुम्ही हा व्हिडीओ पाहा, या व्हिडीओमध्ये बिल गेट्स चपाती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करताना त्यांना अक्षरक्ष: घाम फुटला आहे.

हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले बिल गेट्स चपाती बनवताना दिसत आहेत. बिल गेट्सच्या या रोटी बनवण्याच्या व्हिडीओने सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आणि हा व्हिडीओ पाहताच व्हायरल होऊ लागला.

अमेरिकेचे प्रसिद्ध शेफ इटन बर्नाथ भारत भेटीसाठी आले होते. ईटनने काही दिवस भारतातील बिहार येथे राहिला. त्याने बिहारमध्ये एक अनोखी रेसिपी शिकली जी बहुतेक भारतीयांसाठी सामान्य आहे. ईटनने जेव्हा भारतातील देशी तूप रोटी किंवा तुप चपाती चाखली तेव्हा तो त्याचे कौतुक करताना थकला नाही.

ईटनने जेव्हा त्याचा शोमध्ये या पदार्थाला दाखवण्याचं ठरवलं तेव्हा त्याच्यासोबत जगातील प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स देखील होते. बिल गेट्स भारताला चांगले ओळखतात आणि त्यांनी भारतातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

यानंतर ईटन आणि बिल गेट्स दोघांनी मिळून चपाती बनवायला सुरुवात केली. त्यांनी अगदी पिठ मळण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर पिठाचा गोळा करणं आणि मग त्याची चपाती करुन ती भाजणं आणि खाणं इथपर्यंत सगळं त्यांनी केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की भारतींयासाठी जितकं चपाती बनवणं सोप्पं आहे, त्यापेक्षा खूपच जास्त कठीण हे परदेशी लोकांसाठी आहे. ही चपाती बनवताना बिल गेट्स यांना खूप कष्ट घ्यावे लागले आहे. पण अखेर जेव्हा त्या दोघांनी ही तुप आणि रोटी खाल्ली तेव्हा ती त्यांना खूपच आवडली.

या व्हिडीओवर लोक कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पाडत आहे. या व्हिडीओला भरभरुन व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral