मराठी बातम्या /बातम्या /Viral /धोकादायक ठिकाणी महिलेने चालवली बाईक, Video पाहून चक्रावून जाल

धोकादायक ठिकाणी महिलेने चालवली बाईक, Video पाहून चक्रावून जाल

धोकादायक ठिकाणी महिलेने चालवली बाईक

धोकादायक ठिकाणी महिलेने चालवली बाईक

आजकालच्या आधुनिक जगात महिलाही खूप धाडसी झाल्या आहेत. प्रत्येक काम धाडसानं आणि धैर्यानं करतात. आता तर महिला स्टंट करतानाही दिसून येतात.

नवी दिल्ली, 26 मे : आजकालच्या आधुनिक जगात महिलाही खूप धाडसी झाल्या आहेत. प्रत्येक काम धाडसानं आणि धैर्यानं करतात. आता तर महिला स्टंट करतानाही दिसून येतात. महिलांच्या धाडसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक महिलेचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये ती अगदी धाडसानं भितीदायक ठिकाणी गाडी चालवत आहे. या व्हिडीओेने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

महिला धोकादायक ठिकाणी गाडी चालवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लाल जॅकेट घातलेली एक महिला बाईकवर बसलेली दिसत आहे. पुढच्याच क्षणी कॅमेऱ्याचा अँगल बदलतो आणि समोरचे दृश्य पाहून अंगावर काटा येईल. महिला गाडी चालवत असलेलं ठिकाण धोकादायक असून तेथून चुकून तोल गेला तरी जीव धोक्यात पडेल. जीव जाऊ देखील शकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, थोडीशी चूक झाली आणि महिला बाईकसह शेकडो फूट खाली पडेल. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

इन्स्टाग्राम अकाऊंट @rising.tech वर महिलेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा धोकादायक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटदेखील पहायला मिळत आहे.

दरम्यान, असे स्टंट व्हिडीओ कायमच समोर येत असतात. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी रोज व्हायरल होत असतात.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Stunt video, Viral, Viral videos