मुंबई, 23 मार्च : कधी एकाच चाकावर बाईक पळवणं, कधी हवेत बाईक उडवणं, कधी दोन बाईकवर पाय ठेवून चालणं, कधी चालत्या बाईकवर उभं राहणं, कधी वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवणं.... कित्येक फिल्ममध्ये तुम्ही हिरोंना बाईकवर अशी स्टाईल मारताना पाहिली असेल. फिल्म पाहून कितीतरी तरुणही याचं अनुकरण करतात. रिल लाइफसारखी रिअल लाइफमध्ये हिरोगिरी करत स्टाईल मारायला जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात, असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
एका तरुणाने आधी धूम स्टाईल बाईक पळवली. त्यानंतर समोर असलेल्या दोन ट्रकच्या मध्ये त्याने बाईक टाकली. त्यानंतर त्याच्यासोबत भयंकर घडलं. किंबहुना स्वतः मृत्यूच्या दारात जाणं म्हणजे काय ते हे व्हिडीओ पाहिल्यावर समजेल. समोर मृत्यूचा दार खुला झाला तसं या तरुणाने स्वतःला त्यात झोकून दिलं. नंतर ते घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे.
VIDEO - पिकनिक स्पॉटवर आली मगर; शिकार सोडून जे पळवलं ते पाहून व्हाल थक्क
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर दोन मोठे ट्रक शेजारी शेजारी चालत आहेत. मध्ये किंचितशी जागा आहे. एक तरुण या ट्रकच्या मागून बाईक चालवतो आहे. ट्रकच्या मध्ये जागा आहे. आता दोन गाड्यांच्या मध्ये असा रस्ता मोकळा दिसला की बरेच बाईकस्वार तिथून आपली बाईक काढण्याचा प्रयत्न करतात. या तरुणानेही तसंच केलं.
दोन ट्रकच्या मध्ये तो गेला आणि त्याचा तोल गेला. बाईकवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि बाईकसह तो खाली कोसळला. त्याचक्षणी एका ट्रकच्या चाकाजवळ तो पडला. इथं आपल्या हृदयाचाही ठोका चुकतो. तरुणावरून ट्रेलरच्या मागील चाकं जातात.
भारतातील या गावात श्वानही करोडपती; फुकटात काहीच खात नाहीत, अशी करतात कमाई
पण सुदैवाने तो थोडक्यासाठी बचावतो. त्याला सुखरूप पाहून कुठे हायसं वाटतं. तो स्वतःच कसाबसा सावरत उभा राहतो.
Terrifying & lucky at the same time! 😱pic.twitter.com/wyJyJALY22
— Shocking Video (@ShockingVideo_) March 20, 2023
@ShockingVideo_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral