Home /News /viral /

Shocking Video! आधी बाईकवरून कोसळला नंतर मागून आली कार आणि...; स्टंट करताना तरुणासोबत भयंकर दुर्घटना

Shocking Video! आधी बाईकवरून कोसळला नंतर मागून आली कार आणि...; स्टंट करताना तरुणासोबत भयंकर दुर्घटना

भरधाव बाईकवर स्टंट करताना बाईकस्वाराचा भयंकर अपघात झाला.

    मुंबई, 24 जून : काही तरुणांना बाईक चालवताना स्टंट करण्याची हौस असते. प्रसिद्ध होण्यासाठी तर किती तरी लोक जीवघेणा बाईक स्टंट करतात आणि भयंकर दुर्घटनेला बळी पडतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव बाईकवर स्टंट करता करता एक तरुण रस्ताच्या मधोमध पडला. त्यावेळी रस्त्यावरून इतर गाड्याही जात होत्या. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल (Bike accident video viral). व्हिडीओत पाहू शकता एक तरुण सुरुवातीला बाईक चालवत येतो. बाईक एकदम वेगात आहे. त्यानंतर तो बाईकचं पुढील चाक वर करतो आणि एका चाकावर बाईक त्याच वेगाने चालवण्याचा प्रयत्न करतो. पण काही क्षणातच बाईक घसरते आणि कोसळते. बाईकस्वार बॉलसारखा हवेत उडतो. बाईक एका दिशेला आणि बाईकस्वार दुसऱ्या दिशेला उडतो. ज्यावेळी बाईकस्वार स्टंट करतो तेव्हा बाईक एकदम रस्त्याच्या मधोमध असते आणि त्या रस्त्यावरून इतर गाड्याही जात असतात. जेव्हा बाईकचा अपघात येतो आणि बाईकस्वार रोडवर पडतो त्याचवेळी एक कारही मागून वेगात येते. त्याचवेळी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. हे वाचा - VIDEO - अवघ्या 10 सेकंदावर होता मृत्यू; तरी ट्रॅकवर प्रवाशाला वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी आणि... सुदैवाने रस्त्याच्या मध्यभागी असलेला बाईकस्वार वेळीच बाजूला होता. त्यामुळे कारखाली चिरडण्यापासून वाटतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक चालवताना त्याने हेल्मेट आणि सेफ्टी गिअर्स घातलेले आहेत. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होत नाही. इतक्या मोठ्या अपघातानंतरही त्याचा जीव वाचतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Bike accident, Viral, Viral videos

    पुढील बातम्या