भरधाव ट्रेनसमोर सुरू होता तरुणांचा स्टंट, काय झालं पाहा श्वास रोखून ठेवायाला लावणारा VIDEO

भरधाव ट्रेनसमोर सुरू होता तरुणांचा स्टंट, काय झालं पाहा श्वास रोखून ठेवायाला लावणारा VIDEO

या तरुणांनी कसा केला ट्रेनसमोर जीवघेणा स्टंट, जरा वेळ चुकली असती तर...

  • Share this:

बेतिया, 22 जुलै : केवळ प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेक स्टंट केले जातात. बऱ्याचदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात याची कल्पना असतानाही अशाच प्रकारच्या स्टंटबाजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. जीवघेणा खेळ करणाऱ्या या तरुणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू पोहण्यासाठी नदीत उडी मारण्यासाठी तरुण या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. ट्रेनचा भोंगा वाजला आणि ती जवळ आली की नदीमध्ये उडी मारायची असा या तरुणांचा खेळ आहे. आपला जीव धोक्यात घालून हे स्टंट मजेसाठी केले जात आहेत. 52 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हा खेळ सुरू आहे.

हे वाचा-पोलिसाने 13 व्या मजल्यावरुन मारली उडी; गुन्हेगाराला पकडण्यासाठी जीवाची बाजी

वारंवार रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावर उभं राहू नये यासाठी आवाहन करण्यात येतं तरीही अशा प्रकारे तरुण मुलं ऐकत नाही आणि दुसरं पावसाचे दिवस असल्यानं नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगानं असतो. त्यामुळे बुडण्याची किंवा इजा होण्याचा धोका अधिक असतो. ट्रेन येत असताना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून नदीत पोहोण्यासाठी उडी घेणं म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. हे माहीत असतानाही अशा प्रकारचे खेळ केले जात आहेत.

नदीकिनारी काही लोक हे स्टंट आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आली नाही. दरम्यान हा व्हिडीओ बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या हा जीवघेण्या स्टंटचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

(असे कोणतेही स्टंट करु नयेत अशा प्रकारचे खेळ जीवघेणे आणि धोकादायक ठरु शकतात असं आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे.)

Published by: Kranti Kanetkar
First published: July 22, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या