मराठी बातम्या /बातम्या /Viral /वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय आहे नेमका प्रकार

वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय आहे नेमका प्रकार

सध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे.

सध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे.

सध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे.

बिहार, 30 जानेवारी: बिहारमधील हाजीपूरमध्ये (Hajipur, Bihar) सध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या तपासात असे आढळून आले की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी गोरौल पोलीस स्टेशनच्या (Goraul police station) मलिकपुरा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी गौरोल पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता.

FIR नोंदवल्यानंतर मुलीनं सर्वप्रथम तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर GOT MARRIED... असं स्टेटस अपडेट केलं. . त्यानंतर व्हिडीओ आणि फोटो टाकून स्वत:ला सज्ञान (Adult) असल्याचं सांगून वडिलांवर छळ केल्याचा आरोप केला. अपहरण झाल्याची FIR दाखल झाल्यानंतर मुलीने पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.

Breaking News: 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार 

सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये मुलगी एका मुलासोबत दिसत आहे. मुलगी सांगते की तिने स्वतःच्या इच्छेने मुलाशी लग्न केले आहे आणि ती आनंदी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असून मला त्रास देऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांना करताना दिसत आहे.

FIR आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून हे प्रकरण प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी संबंधित वादाचे असल्याचे दिसते. सध्या पोलिसांजवळ अपहरणाचा गुन्हा आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा आणखीन खोलात जाऊन शोध घेत आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Video viral