Home /News /viral /

VIDEO - भर वर्गात शिक्षिकेचं लज्जास्पद कृत्य; स्वत: झोपली आणि विद्यार्थिनीला करायला लावलं नको ते काम

VIDEO - भर वर्गात शिक्षिकेचं लज्जास्पद कृत्य; स्वत: झोपली आणि विद्यार्थिनीला करायला लावलं नको ते काम

शाळेत शिकवणं सोडून शिक्षिकेने असं काही केलं की व्हिडीओ पाहून सर्वांचा संताप झाला आहे.

  पाटणा, 07 जून : शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर. पण अशाच ज्ञानाच्या मंदिरात एका शिक्षिकेने लज्जास्पद कृत्य केलं आहे. विद्यार्थ्यांना शिकवणं सोडून ही शिक्षिका भरवर्गात स्वतः झोपली. त्यानंतर तिने एका विद्यार्थिनीकडून नको ते काम करून घेतलं. शाळेत शिकायला आलेल्या विद्यार्थीनीला या शिक्षिकेने अभ्यास सोडून भलतंच काम करायला भाग पाडलं. शिक्षिकेचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनी संताप व्यक्त केला आहे (Teacher Student Video). हा व्हिडीओ बिहारच्या शाळेतील असल्याचं सांगितलं जातं आहे. ही एक सरकारी शाळा आहे. व्हिडीओत पाहू शकता काही विद्यार्थी वर्गात जमिनीवर बसले आहेत. तिथंच जवळ एक खुर्ची आहे. या खुर्चीवर शिक्षिका बसली आहे आणि तिच्या शेजारी एक विद्यार्थीनी उभी आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर ही शिक्षिका फक्त बसली नाही आहे तर ढाराढूर झोपली आहे (Teacher Sleeping in school Video) आणि तिच्या शेजारी उभी असलेली विद्यार्थीनी आपल्या हातात पंखा घेऊन तिला वारा घालते आहे. हे वाचा - रेस जिंकल्याच्या उत्साहात सायकलिस्टकडून घडलं भयंकर कृत्य; थेट रुग्णालयात पोहोचली बायको एकतर ही शिक्षिका भरवर्गात झोपली आहे आणि आपल्याला गरम होऊ नये म्हणून तिने विद्यार्थीनीलाच वारा घालण्याासाठी आपल्या बाजूला उभं केलं आहे.
  baatbiharki  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यत आला आहे. बिहारच्या मुलांचं भविष्य अंधारात टाकून आरामात झोपणारी शिक्षिका असं कॅप्शन या व्हिडीला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत. या शिक्षिकेच्या या कृत्याबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bihar, Shocking video viral, Student, Teacher, Viral, Viral videos

  पुढील बातम्या