कटिहार (बिहार), 21 ऑक्टोबर : क्रिकेट म्हणजे इंग्रजी कॉमेंट्री असं समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून होतं. 5-6 वर्षांपासून हिंदी कॉमेंट्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंग्रजी कॉमेंट्री समजणं तसं कठिणचं, त्यात परदेशी कॉमेंटेटर सारखं बोलणं म्हणजे अशक्य. तरी हर्षा भोगले, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर यांनी भारतीय पद्धतीनं इंग्रजी कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहारच्या कटिहार जिल्ह्यात राहणारे एक शिक्षक परदेशी खेळाडूंना आणि कॉमेंटेटरना लाजवेल अशी इंग्रजी कॉमेंट्री करतात. वरुण देव असे त्यांचे नाव असून त्यांना इंग्रजीमध्ये कॉमेंट्री करण्याची आवड आहे.
वरुण देव यांनी लहानपणी क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान इंग्रजी कॉमेंट्री ऐकून, या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे ठरवले. मात्र मोठं झाल्यानंतर उपजिविकेसाठी त्यांचे हे स्वप्न मागे राहिले. वरुण देव हे सध्या कटिहार जिल्ह्यातील मनिहारी उपविभागातील खेड्यातील रहिवासी असून येथील सरकारी शाळेत कार्यकारी प्राचार्य आहेत. मात्र वरुण देव यांची इंग्रजी कॉमेंट्री आजही सर्वांना थक्क करते. वरुण देव यांचा एका स्थानिक चॅनलनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-KKRच्या 'या' स्टार खेळाडूनं दिली गोड बातमी, लवकरच होणार बाबा!
वाचा-IPL 2020 जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला मोहम्मद कैफचा कानमंत्र, म्हणाला...
वरुण देव म्हणतात की, मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या भावाकडून इंग्रजी भाषेवर जोरदार पकड ठेवण्याची प्रेरणा मला मिळाली. लहानपणापासूनच अभ्यासामध्ये अव्वल स्थान मिळवणारा वरुण इंग्रजीव्यतिरिक्त गणित व विज्ञानातही खूप हुशार आहे. जिल्ह्यात कोणताही मोठा कार्यक्रम झाल्यास त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी वरुण यांना दिली जाते.
1992 पासून क्रिकेट कॉमेंट्रीला सुरुवात
वरुण देव यांच्या आयुष्यात 1975च्या वर्ल्ड कपनं मोठा बदल घडवून आणला. त्यावेळी ते पाचवीत होते. क्रिकेट पाहताचा इंग्रजी कॉमेंट्री ऐकून त्यांच्याही मनात इच्छा झाली. तेव्हा पासून त्यांनी इंग्रजी समजण्यात सुरुवात केली. इंग्रजी कॉमेंटेटरचे उच्चारण समजण्यात त्याला थोडी अडचण होती, मात्र त्यांनी या समस्यवरही तोडगा काढला. 1992 पासून त्यांनी स्थानिक क्रिकेट सामन्यात कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली.
वाचा-पंजाबच्या विजयी हॅट्रिकनं वाढवली 4 संघांची चिंता, टाका Point Tableवर एक नजर
आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर होण्याची वरुण यांची इच्छा
वरुण देव पेशाने शिक्षक आहेत, मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर व्हायचे आहे. वरुण देव म्हणतात की, मला आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर व्हायचे आहे. मात्र माझे कोणतेही माध्यम नाही ज्याद्वारे मी हे स्वप्न पूर्ण करु शकेन. शिक्षक असल्यामुळे त्यांचे हे दडलेले कौशल्य अद्याक लोकांसमोर आले नाही आहे.