Home /News /viral /

VIRAL VIDEO: धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतरली महिला, मुलांसह गाडीखाली आली! आणि...

VIRAL VIDEO: धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतरली महिला, मुलांसह गाडीखाली आली! आणि...

या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक महिलेनं तिच्या लहान मुलासह रेल्वे सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उडी मारली. त्यानंतर तिचा तोल गेला, आणि ती मुलासह रेल्वेच्या खाली आली. जवळपास दोन मिनिटे ती मुलासह रेल्वेच्या खाली होती.

    मुंगेर (बिहार) 3 सप्टेंबर : धावत्या रेल्वेतून (Train) खाली उतरु नये किंवा त्यामध्ये चढण्याचाही प्रयत्न करू नये, अशी सूचना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिली जाते. या प्रकारे रेल्वेतून उडी मारल्यास कायमचं अपंगवत्व येण्याचा धोका असतो. तसेच प्रसंगी जीवही जावू शकतो. या सूचना सतत देऊनही अनेकदा या प्रकारच्या घटना घडतात. सध्या सोशल मीडियावरही अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिलेनं तिच्या लहान मुलासह रेल्वे सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उडी मारली. त्यानंतर तिचा तोल गेला, आणि ती मुलासह रेल्वेच्या खाली आली. जवळपास दोन मिनिटे ती मुलासह रेल्वेच्या खाली होती. पण सुदैवाची बाब म्हणजे तिला काहीही झालं नाही. रेल्वे निघून गेल्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. बिहारमधील (Bihar जमालपूर रेल्वे स्टेशनवरील ही घटना आहे. गुरुवार (2 सप्टेंबर) दुपारी 4 वाजून 38 मिनिटांनी हा प्रकार घडला. जमालपूर स्टेशनवरुन भागलपूरला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमधून या महिलेनं मुलासह प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि ती तोल गेल्यानं रेल्वे खाली आली. प्लॅटफॉर्मवरील आरपीएफ आणि जीआरपी स्टाफनं त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत ती महिला रेल्वेच्या खाली आली होती. या घटनेनं स्टेशनवरील सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला होता. महिला आणि मुलाच्या जीवाचं काय झालं असेल? अशीच भीती सर्वांच्या मनात होती. त्या महिलेवर मात्र 'काळ आला असला तरी वेळ आली नव्हती'. त्यामुळे इतक्या मोठ्या घटनेनंतरही त्यांना काही झाले नाही. प्लॅटफॉर्मवरील आरडाओरड ऐकून रेल्वे पोलीस सतर्क झाले. त्यांनी तातडीनं रेल्वे थांबवून दोघांना बाहेर काढलं. चालत्या बाईकवर आरामात झोपला दुचाकीस्वार अन्...; स्टंटचा हा Video पाहून व्हाल हैराण या सर्व प्रकारात त्या महिलेला काही ठिकाणी जखमही झाली आहे. पारो देवी असं या 35 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. त्या आणि त्यांचा मुलगा यामध्ये सुखरुप वाचला. पण, अशा प्रकारे धावत्या रेल्वेत चढण्याचं किंवा उतरण्याचं धाडस कुणीही करु नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं पुन्हा एकदा केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Video viral

    पुढील बातम्या