Home /News /viral /

समोर सुरू होते सप्तपदी आणि भावानंच केला हवेत तुफान गोळीबार, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

समोर सुरू होते सप्तपदी आणि भावानंच केला हवेत तुफान गोळीबार, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

गोळीबार करणारा तरुण CISFचा जवान असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या भावाच्या लग्नात आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी आलेल्या या तरुणानं हवेत गोळीबार केला आहे.

    रोहतास, 10 डिसेंबर : लग्नमंडपात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहतास इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडीओ खुटिया-मठिया इथला असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता या तरुणाच्या दोन्ही बाजूला लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं बसली आहेत. सुटाबुटात असलेला तरुण हातातून पिस्तूल काढतो आणि हवेत गोळीबार करतो. गोळीबार करणारा तरुण CISFचा जवान असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या भावाच्या लग्नात आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी आलेल्या या तरुणानं हवेत गोळीबार केला आहे. हे वाचा-8 सेकंदांसाठी मोडला क्वारंटाइनचा नियम, भरावा लागला 2.57 लाख रुपये दंड भावाच्या लग्नात सुटाबुटात आलेल्या या तरुणानं हवेत गोळीबार केला आहे. या तरुणाला लग्नमंडपात कुणी अडवत नाही किंवा ओरडत देखील नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना बिहारच्या रोहतास इथली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bihar

    पुढील बातम्या