Home /News /viral /

आई गं! गाडीवर जडलं प्रेम अन् चक्क घरावर बांधली स्कोर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी

आई गं! गाडीवर जडलं प्रेम अन् चक्क घरावर बांधली स्कोर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी

अनेकजण आपल्या गाड्यांवर जीवापाड प्रेम करत असतात. अनेकजण आपली पहिली गाडी न विकता ती जपून ठेवतात.

    पाटणा, 29 ऑक्टोबर : अनेकजण आपल्या गाड्यांवर जीवापाड प्रेम करत असतात. अनेकजण आपली पहिली गाडी न विकता ती जपून ठेवतात. त्याचप्रमाणे बिहारमधील एका व्यक्तीने चक्क त्याच्या स्कॉर्पिओ गाडीवरील प्रेमापोटी त्याने घराच्या टेरेसवर तिची प्रतिकृती उभी केली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील इंतसर आलम यांनी आपल्या आयुष्यात स्कॉर्पिओ ही गाडी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीच्या प्रेमापोटी त्यांनी चक्क आपल्या चार मजली घरावर या गाडीचे मॉडेल उभे केले आहे. स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, टेरेसवरील या गाडीचे सेम मॉडेल तयार केले गेले असून सेम क्रमांकाची नंबर प्लेट देखील यावर लावण्यात आली आहे. ही गाडी तयार करण्यात आली नसून गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. या स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना त्यांच्या पत्नीची होती. उत्तर प्रदेशच्या आग्राच्या ट्रीपवेळी तिच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली होती. त्यानंतर या टाकीच्या आकाराचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना आली. त्याने यासाठी कोणताही वेळ न घालवता आग्र्यावरून कामगार आणत हे काम सुरु केले. या संपूर्ण कामासाठी त्याला अडीच लाख रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर कामगारांनी दिवसाला 1200 रुपये मजुरी घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले. हे वाचा-साखर नाही तर हिरा चोरून लखपती झाली मुंगी, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य स्कॉर्पिओविषयी केवळ इंतसर आलम यांनाच प्रेम नसून संपूर्ण बिहारमध्ये या गाडीविषयी क्रेझ आहे. या भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना स्कॉर्पिओसारख्या मजबूत आणि टिकाऊ गाड्यांची गरज पडते. बिहारमधील अनेक राजकीय नेत्यांकडेदेखील स्कॉर्पिओ असतात. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या बिहार निवडणुकीमध्ये देखील स्कॉर्पिओचा बोलबाला दिसून येत आहे. भागलपूर जिल्ह्यात स्कॉर्पिओची इतकी मागणी आहे की, डीलर गाड्यांची पूर्तता करू शकत नसून, ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वेटिंगवर थांबावे लागत आहे. स्कॉर्पियो ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची एसयूव्ही आहे. चालवायला दणकट, दिसायला आकर्षक आणि परवडणारी अशी तिची वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे एसयूव्ही प्रकारातील गाड्या घेणारे अनेक लोक महाराष्ट्रातही तीच गाडी पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या गाडीची मागणी खूप असते. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ही गाडी उत्कृष्ट आणि आरामदायी मानली जाते.
    First published:

    पुढील बातम्या