पटना, 25 ऑगस्ट : प्रेमात असलेल्या लोकांनी एकमेकांसाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन, समाजाला झुगारुन अनेक गोष्टी केल्याचं अनेकदा समोर आलं आहे. कित्येक वर्षापासून प्रेमाचे अनेक अजब किस्से समोर आले आहेत. आता अशीच एक अजब कहाणी समोर आली असून आत्याने भाच्याशी लग्न केल्याचं समोर आलं आहे.
बिहारमध्ये या अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. इथे राहणाऱ्या नात्याने आत्या असणाऱ्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन भाच्याशी लग्न केलं. त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, की वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली, जेणेकरुन ते लग्न करू शकतील. मंगळवारी नात्याने आत्या आणि भाचा असलेल्या दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. या लग्नाची मोठी चर्चा असून आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय 18 वर्ष असून भाच्याचं, नवरदेवाचं वय 19 वर्ष आहे.
सहा वर्षांपूर्वी आदित्य पटेल आपल्या मामाकडे एका लग्नात आला होता. त्यावेळी त्याचं नात्याने आत्या असणाऱ्या आंचल पटेलशी प्रेम झालं. एकमेकांनी त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं कबूल केलं. पण मुलगी नात्याने मुलाची आत्या लागत असल्याने, त्यांच्या कुटुंबाचा दोघांच्या लग्नाला विरोध होता.
मुलीने कुटुंबिय तिला मारहाण करत असल्याचं सांगितलं. परंतु जसं मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली, तसं तीन दिवसांनी तिने घरातून पळून मंगळवारी प्रियकराशी लग्न केलं. मुलगी घरात नसल्याने तिची शोधाशोध झाली. तिचे कुटुंबिय थेट मुलाच्या घरी पोहोचले. परंतु त्या दोघांच्या हट्टापुढे कुटुंबियांनी अखेर लग्नासाठी परवानगी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.