दुचाकीस्वारांकडून वकिलाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार, पाहा थरारक VIDEO

दुचाकीस्वारांकडून वकिलाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार, पाहा थरारक VIDEO

या व्हिडीओच्या आधारे पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे

  • Share this:

गोपाळगंज, 30 ऑगस्ट : बिहारच्या गोपाळगंज परिसरात सतत्यानं गुन्हे घडत असल्याचं समोर येत आहे. पोलिसांना न जुमानता आता रात्री अंदाधुंद गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर ते नेत्यापर्यंत आणि आता तर वकिलाच्या घरावरही गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार करताना दुचाकीस्वार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

RJD नेता आणि पीपी रामनाथ साहू यांच्या घरावर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. रामनाथ साहू हे तिहेरी हत्याकांड प्रकरणी सध्या कोर्टात पीडित जे.पी. यादव यांच्या बाजूनं खटला लढत आहेत. या प्रकरणात चार लोकांची नावे आहेत ज्यात जेडीयूचे आमदार पप्पू पांडे, त्यांचे मोठे भाऊ सतीश पांडे, पुतणे जिल्हा परशद अध्यक्ष मुकेश पांडे यांचा समावेश आहे. आरोपींना जामीन मिळू नये यासाठी आम्ही न्यायालयात मागणी केल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-...आणि 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपून आरोपीला पकडलं, पाहा खऱ्या सिंघमचा VIDEO

या व्हिडीओच्या आधारे पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. या गोळीबार करणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. या गोळीबारात वकील आणि त्यांचं कुटुंब थोडक्यात वाचल्याचं सांगितलं जात आहे. नगर पोलीस ठाणा क्षेत्रापासून दीडशे मीटर अंतरावर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 30, 2020, 12:03 PM IST
Tags: bihar

ताज्या बातम्या