Home /News /viral /

VIDEO : बिहार निवडणुकीआधी मोठी बातमी, भाषणा दरम्यान तुटला काँग्रेसचा मंच

VIDEO : बिहार निवडणुकीआधी मोठी बातमी, भाषणा दरम्यान तुटला काँग्रेसचा मंच

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात प्रचार रंगात आला असताना दरभंगा इथे हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

    दरभंगा, 29 ऑक्टोबर : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या प्रचारसभेदरम्यान एक मोठा अपघात झाला. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. याच प्रचारादरम्यान दुर्घटना समोर आली आहे. काँग्रेस प्रचारसभेदरम्यान घोषणा देत असताना स्टेज कोसळला आणि नेते, उमेदवार खाली कोसळले. काँग्रेस उमेदवार मशकूर अहमद उस्मानी जनतेशी संवाद साधत असताना अचानक मंच तुटला आणि मोठी दुर्घटना घडली. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्टेज कोसळण्याआजी मशकूर अहमद उस्मानी जोरजोरात घोषणा देत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यांनी भाषण सुरू असताना स्टेज डगमगला आणि कोसळला. सुदैवान या घटनेत कोणी गंभीर जखमी झालं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात प्रचार रंगात आला असताना दरभंगा इथे हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरभंगा इथे काँग्रेसकडून मशकूर अहमद उस्मानी यांना तिकीटट देण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Congress

    पुढील बातम्या