मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Bihar Crime : बॉयफ्रेंडसाठी कायपण! पाच मैत्रिणींनी मिळून एका मुलीला बॉयफ्रेंडसाठी चोपला, व्हिडिओ व्हायरल

Bihar Crime : बॉयफ्रेंडसाठी कायपण! पाच मैत्रिणींनी मिळून एका मुलीला बॉयफ्रेंडसाठी चोपला, व्हिडिओ व्हायरल

बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पटना, 29 नोव्हेंबर : बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पाच मुलींनी मिळून जत्रेत एका मुलीला बेदम मारहाण केली आहे. हे भांडण बॉयफ्रेंडवरून झाल्याचं सांगण्यात येत आहे. भर जत्रेत हा प्रकार घडला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

या व्हिडिओतील मुली कोण आहेत, याबद्दल अद्याप ओळख पटलेली नाही. पण हाणामारीचा व्हिडिओ मात्र जोरदार व्हायरल होत आहे. या मारहाणीबद्दल कुणीही पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती नाही. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

हे ही वाचा : चेहऱ्यावर घरगुती उपाय करताना अशी घ्या काळजी; तुमच्यावरून हटणार नाही कोणाची नजर

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुली मिळून एका मुलीला बेदम मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. काही जणी लाथांनी मारहाण करत आहेत, तर काही जणी त्या मुलीला बुक्के मारत आहेत. तेवढ्यात कोणीतरी एक त्या मुलीचे केस ओढून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान एक मुलगा त्या मुलीला या भांडणातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मुली तिला सोडत नाहीत. त्या तिला मारहाण करतच राहतात असंही या व्हिडिओत दिसतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच मुलींनी एका मुलीला जोरदार मारहाण केली. या भांडणाचं कारण एक मुलगा होता. होय, ज्या मुलीला इतर मुलींनी मारहाण केली, ती मुलगी कोणत्या तरी दुसऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्यासोबत या जत्रेत फिरत होती. यामुळे त्या मुलाची पहिली गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून तिला जत्रेत सर्वांसमोर मारहाण केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तो मुलगा तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या मुली मात्र तिला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करताना दिसतात.

हे ही वाचा : एक दिवस सगळ्यांच्या Whats app स्टेट्सला माझा फोटो असणार, म्हणत तरुणाने घेतला गळफास

दरम्यान, मारहाण करणाऱ्या मुली कोण होत्या, जिला मारहाण झाली ती कोण होती आणि ज्या मुलासाठी हे सर्व भांडण झालं तो कोण होता, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्या मुलींनी केलेल्या या मारहाणीत मुलगी जखमी झाल्याची शक्यता आहे, पण याबद्दल कोणीही तक्रार केल्याची माहिती कळू शकलेली नाही. पण भांडणाचा व्हिडिओ मात्र जोरदार व्हायरल होताना दिसतोय.

सोशल मीडियावर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच नेटकरी यावर विविध प्रतिक्रियाही देत आहेत. जर भांडण बॉयफ्रेंडसाठी झालं असेल तर त्या मुलींनी त्याला मारायला हवं होतं, मुलीला मारण्याची काय गरज होती, असंही काही जण म्हणत आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime, Crime news, Girlfriend