4 सेकंदात कोसळलं घर पण थोडक्यात बचावला जीव, पाहा थरारक VIDEO

4 सेकंदात कोसळलं घर पण थोडक्यात बचावला जीव, पाहा थरारक VIDEO

काळ आला होता पण...अवघ्या 4 सेकंदात कोसळलं घर, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

  • Share this:

पटना, 12 सप्टेंबर : पूर्णिया इथे मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. बायसी इथे काही सेकंदात पक्क घर नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक मुलगी या घराच्या पायऱ्यांवर बसली होती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. थोडक्यात या तरुणीचा जीव वाचल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हळूहळू या घराची माती नदीत पडते आणि अवघ्या 4 सेकंदात हे घर नदीत बुडतं. या मुलीला घर कोसळणार असल्याची कुणकुण लागते म्हणून ती ताडकन उठते आणि घर कोसळतं. 4 सेकंद मनाला हादरवून जाणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-आडवळणाला चालत्या बसने घेतला अचानक पेट, अंगावर काटा आणणारा VIDEO

यापूर्वीही बरीच घरे व घरे नदीत कोसळली आहेत. बियासीचे आमदार हाजी सुभान आणि खासदार मोहम्मद जावेद यांनाही माहिती देण्यात आली. याबाबत स्थानिक प्रशासनालाही कळविण्यात आले होते, परंतु आजपर्यंत कोणीही दखल घेण्याचा प्रयत्न केला नाही.

कोरोनाच्या कचाट्यात पूरस्थितीचा सामना करत असलेल्या ग्रामस्थांनी या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे थैमान घातलं आहे. नागरिकांना कोरोनासोबतच पूर, पाऊस आणि अशा आस्मानी संकटांचा सामना करावा लागत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 12, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या