मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पहिला परफॉर्मन्स ठरला अखेरचा! डान्स करताना गेला तरुणाचा जीव; मृत्यूचा LIVE VIDEO

पहिला परफॉर्मन्स ठरला अखेरचा! डान्स करताना गेला तरुणाचा जीव; मृत्यूचा LIVE VIDEO

एक ग्रुप पहिल्यांदाच लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होते. पण त्याचवेळी एक भयंकर दुर्घटना झाली.

एक ग्रुप पहिल्यांदाच लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होते. पण त्याचवेळी एक भयंकर दुर्घटना झाली.

एक ग्रुप पहिल्यांदाच लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होते. पण त्याचवेळी एक भयंकर दुर्घटना झाली.

  • Published by:  Priya Lad
हाँगकाँग, 29 जुलै : दुर्घटना, अपघात कधी, कुठे, कसा होईल सांगू शकत नाही. किती सतर्क राहिलो तर जे होणं ठरलेलं असतं ते कसंही होतंच. अशाच एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एक ग्रुप पहिल्यांदाच लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होते. पण त्याचवेळी एक भयंकर दुर्घटना झाली. यामध्ये एका तरुणाचा जीवही गेला आहे. एका म्युझिक कन्सर्टमधील ही घटना आहे.  27 जुलैला हाँगकाँगमध्ये एक लाइव्ह म्युझिक कन्सर्ट सुरू होता. हाँगकाँगच्या कोलिसियममध्ये रात्री हा शो होता.  एक बँड बॉयचा ग्रुप स्टेजवर परफॉर्म करत होतं. माहितीनुसार हा त्यांचा पहिलाच परफॉर्मनस होता. सर्वजण आनंदात, उत्साहात होते. बॉय बँड जोशात परफॉर्म करत होते. तर प्रेक्षकही अगदी त्याचा भरभरून आनंद लुटत होते. पण अचानक असं काही झालं की खळबळ उडाली. डान्स करत असताना काही तरुणांवर  वरून अचानक मोठी  स्क्रिन कोसळली. त्याखाली ते चिरडले गेले.  व्हिडीओत पाहू शकता स्टेजच्या वर एक मोठी एलसीडी स्क्रिन आहे. जी हळूहळू खाली येताना दिसते आहे. त्याचवेळी एक तरुण त्याखालून जाते. ज्याच्यावर ही स्क्रिन उभीच्या उभी पडते. तो जमिनीवर आडवा होतो आणि त्याच्या शरीराच्या मधोमध ही स्क्रिन उभीच राहते. त्यानंतर स्क्रिन जमिनीवर आडवी पडते आणि त्याखाली काही तरुण येतात. हे वाचा - मृत्यूचा सेल्फी! एक क्लिक आणि धडावेगळं झालं शीर; सेल्फीच्या नादात तरुणाचा दुर्दैवी अंत त्यानंतर डान्स करणारे इतर सर्वजण घाबरतात आणि ते लगेच बाजूला होतात. त्यामुळे सुदैवाने ते वाचतात. पण त्यानंतर ते आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी धावत जातात. प्रत्यक्षदर्शीनींनी दिलेल्या माहितीनुसार, डान्सर्स स्टेजवर फिरत परफॉर्म करत होते. त्यावेळी स्क्रिनची एक तार लूझ झाली. त्याचवेळी एक डान्सर त्याखालून जात होता. ती तार त्याच्या पायात आली. त्याने ती बाजूला केली. पण तोपर्यंत स्क्रिन लूझ झाली आणि ती खाली आली. हे वाचा - बाईक्स घसरताच वरून कोसळली कार, 'मौत का कुआं'मध्ये चिरडले बाईकर्स; अपघाताचा थरारक LIVE VIDEO माहितीनुसार यात तीन जणांना दुखापत झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर रुग्णालयात उपाचार सुरू आहे. न्यूज रिपोर्टर Ezra Cheung ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या