नवी दिल्ली 03 एप्रिल : अपघात कधीही, कुठेही होऊ शकतो. मात्र अनेकदा देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण सत्यात उतरताना दिसते. जेव्हा देव एखाद्याच्या पाठीशी असतो तेव्हा व्यक्ती मृत्यूच्या दारातूनही परत येतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच अमेरिकेत घडली. इथल्या एका रस्त्यावर अनेक वाहने धावत होती. इतक्यात दोन वाहनांच्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेत अचानक मोठं झाड पडलं (Tree Falls on Road). चुकूनही एखादं वाहन या झाडाखाली आलं असतं तर यात जीव जाण्याचीही शक्यता होती. या अपघाताचा व्हिडिओ (Accident Video Viral) सध्या समोर आला आहे.
सोशल मीडिया अकाउंट व्हायरल हॉगने नुकताच या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूपच धक्कादायक आहे. हा व्हिडिओ कॅलिफोर्नियातील लेक टाहो येथील आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, आनंद आहे की कोणालाही दुखापत झाली नाही. हे झाडं जिथे कोसळलं तिथून अनेक वाहनं जाताना दिसत आहे. मात्र सुदैवाने झाड कोसळलं तेव्हा त्याखाली कोणीही नव्हतं. अन्यथा जीवितहानी होण्याची शक्यता होती.
व्हिडिओमध्ये अनेक गाड्या रस्त्यावर उभा असल्याचं दिसतं. रस्त्यालगतच झाडं तोडण्याचं काम सुरू आहे. व्हिडिओ कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने शूट केले आहेत आणि त्या कारच्या समोरही अनेक गाड्या आहेत. गाड्या एकाजागी उभा आहेत की चालत आहेत हे व्हिडिओवरून स्पष्ट होत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारमधून हे रेकॉर्डिंग सुरू आहे, ती गाडी थोडी पुढे सरकताच समोरून एक मोठं झाड रस्त्यावरच कोसळलं. अचानक व्हिडिओ बनवणारी व्यक्ती गाडीत कॅमेरा मागे फिरवते, तेव्हा मागच्या सीटवर एक कुत्रा बसलेला दिसतो, जो या घटनेने घाबरलेला दिसतो.
व्हिडिओला आतापर्यंत 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, मागे बसलेला कुत्रा घाबरला आहे की इथे काय चाललं आहे. एकाने तर लोकांची पर्वा न करता म्हटलं की 'झाड पडल्याने झाडाला दुखापत झाली असावी'. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्या भागात लाकडाशी संबंधित काम केलं जातं, तिथे हे दृश्य सामान्य आहे. परंतु रस्त्यावर झाडं पडलं तेव्हा त्याच्या अतिशय जवळ गाड्याही होत्या. हे दृश्य धक्कादायक आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.