मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोचीने घायाळ केलं तरी एकट्या उंदराने दोन-दोन कोंबड्यांशी दिली झुंज; जरूर पाहा VIDEO चा शेवट

चोचीने घायाळ केलं तरी एकट्या उंदराने दोन-दोन कोंबड्यांशी दिली झुंज; जरूर पाहा VIDEO चा शेवट

उंदीर आणि मांजराच्या फाइटपेक्षाही जबरदस्त अशी कोंबडा आणि उंदराच्या फाइटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

उंदीर आणि मांजराच्या फाइटपेक्षाही जबरदस्त अशी कोंबडा आणि उंदराच्या फाइटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

उंदीर आणि मांजराच्या फाइटपेक्षाही जबरदस्त अशी कोंबडा आणि उंदराच्या फाइटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 01 ऑगस्ट : उंदीर म्हटलं की आपल्यासमोर लगेच येते ती मांजर. म्हणजे उंदीर आणि मांजराची फाइट. ज्याचं कार्टुन म्हणजे टॉम अँड जेरीसुद्धा आपण पाहत आलो आहोत. पण आता उंदीर आणि मांजराच्या फाइटपेक्षाही जबरदस्त अशी कोंबडा आणि उंदराच्या फाइटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओचा शेवटही तितकाच खतरनाक आहे. सामान्यपणे उंदाराला भित्रा प्राणी समजलं जातं. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही यापुढे उंदराला भित्रा कधीच म्हणणार नाही किंवा कोणत्या भित्र्या माणसाची भित्र्या उंदराशी तुलना करणार नाही. इतकी या व्हिडीओतील उंदराने कोंबड्याशी जबरदस्त फाइट दिली आहे.  व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक काळ्या रंगाचा कोंबडा दिसतो. त्याच्या समोर त्याला अचानक एक मोठा उंदीर दिसतो. उंदीर हळूहळू चालत पुढे येतो. कोंबडा आणि उंदराचा आमनासामना होतो. हे वाचा - WOW! कबुतराचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; अद्भुत टॅलेंट पाहून थक्क व्हाल; Watch Video कोंबडा उंदरावर हल्ला करतो. तो उंदराला चोच मारतो. त्यानंतर उंदीरही संतप्त होतो. तो कोंबड्यावर प्रतिवार करतो. कोंबड्याने चोच मारतात उंदीरही त्या कोंबड्याला चावतो. दोघं जण आपसात भिडतात. त्यानंतर तिथं असलेला दुसरा पांढरा कोंबडा काळ्या कोंबड्याच्या मदतीसाठी धावून येतो. तो उंदरावर हल्ला करतो. पण तरी उंदीर घाबरत नाही. तो काळ्या कोंबड्याच्या मागे धावत सुटतो. थोडं पुढे गेल्यावर काळा कोंबडा उंदराला जोरात चोच मारतो. कोंबडा इतक्या जोरात हल्ला करतो की उंदीर जमिनीवर पडतो. तो अर्धमेला होता. कोंबडा आणि उंदराच्या लढाईत या उंदराचं नेमकं झालं ते या व्हिडीओत दिसत नाही पण या उंदराने कोंबड्यांना जबरदस्त टक्कर दिली आहे. त्याने हार मानली नाही. शेवटपर्यंत तो लढत राहिला. हे वाचा - VIDEO - चवताळलेल्या हत्तीसमोर बिनधास्तपणे छाती ताणून उभा राहिला तरुण आणि...; धक्कादायक शेवट व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने उंदीर नाटक करत असावा, तो मृत झाला नाही, असं म्हटलं आहे. तर एकाने जमिनीवर रक्त दिसत आहे, त्यावरून उंदीर गंभीर जखमी झाला, असं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या