Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आम्रपाली दुबेची फसवणूक दहावी पास मुलाशी झालं लग्न? अभिनेत्रीकडून Video शेअर

आम्रपाली दुबेची फसवणूक दहावी पास मुलाशी झालं लग्न? अभिनेत्रीकडून Video शेअर

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

आम्रपालीने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ टाकले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 24 जानेवारी : भोजपुरीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आम्रपाली दुबे नेहमीच चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर असंख्य फॅन आहेत. आम्रपाली सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या फॅन्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर काहीतरी अपलोड करत असते. अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचं भोजपुरी सिंगर, कंपोजर तसेच अभिनेत निरहुआ म्हणजे दिनेश यादव याच्यासह रिलेशनशिपमध्ये असलेल्याचं अनेकदा म्हटलं गेलं आहे.

पण आता आम्रपालीने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ टाकले आहे. जे पाहून तिच्या फॅन्सला धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये ती लग्नाच्या कपड्यात आणि सिंदूर लावलेली दिसत आहे. आम्रपालीने दहावी पास मुलाशी लग्न केल्याचं देखील म्हटलं जात आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणखी जास्त धक्का बसला आहे.

हे ही पाहा : बँकेला 5 कोटींचा गंडा, प्लास्टिक सर्जरीकरुन चेहराही बदलला पण एक चुक आणि खेळ खल्लास

आता यानंतर अनेकांच्या डोक्यात असं सुरु असेल की पैशांसाठी केलं असावं किंवा तिच्यावर अशी वेळ कशामुळे आली असावी, हा पब्लिसीटी स्टंट असावा का. तर आम्ही तुम्हाला सांगतो, असं काहीही झालेलं नाही. आम्रपालीने आपल्या नवीन मूव्हीचं प्रमोशन केलं आहे.

खरं तर, तरुणांच्या हृदयाच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता अरविंद अकेला कल्लू आणि यूट्यूब क्वीन आम्रपाली दुबे यांचा 'शादी मुबारक' (भोजपुरी चित्रपट) लवकरच थिएटरमध्ये दिसणार आहे. याआधी, या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये कल्लू 10वी नापास व्यक्तीची भूमिका साकारत आहे आणि आम्रपाली दुबे पदवीधर जिल्हा टॉपरची भूमिका साकारत आहे.

आता अशा परिस्थितीत जेव्हा कल्लूच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगी शोधली तेव्हा त्यांना सर्वत्र नकार मिळाला. कारण मुलगा कमी शिकलेला आहे. तिथे त्यांची आम्रपाली दुबे आणि तिच्या कुटुंबियांची भेट होते. दोघांच्या लग्नाची चर्चा रंगते आणि ते लग्न करतात.

ही गोष्ट आधी आम्रपालीला माहिन नसते, पण जेव्हा तिला लग्नानंतर या गोष्टीबद्दल कळतं तेव्हा ती कल्लूशी नाते तोडते, पण सिंदूराची लाजही राखते. एकूणच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिक्षण आणि नात्याचे महत्त्व दाखवण्यात आलं आहे.

यादरम्यान तुम्हाला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर ऍक्शन, रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून तो अश्लीलतेपासून दूर आहे. मात्र, या ट्रेलरमध्ये हे स्पष्ट झालेले नाही की, ते लग्न कसं ठरतं, त्यामुळे या ट्वीस्टसाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

First published:

Tags: Entertainment, Social media, Top trending, Videos viral, Viral