• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • 24 कोटींची म्हैस कधी पाहिली आहात का?, जी खाते काजू-बदाम; वजनही आहे 1500 किलो

24 कोटींची म्हैस कधी पाहिली आहात का?, जी खाते काजू-बदाम; वजनही आहे 1500 किलो

भीम ही तिसऱ्यांदा या मेळ्यात आली आहे. तिला 24 कोटींची बोली लागली आहे.

  • Share this:
    पुष्कर, 18 नोव्हेंबर: राजस्थानातील (Rajasthan) पुष्कर येथील प्राणी मेळ्यात एकापेक्षा एक बहुमोल आणि आकर्षक उंट आणि घोडे दाखल झाले. मात्र या मेळ्यात एक म्हैस (Buffalo) सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. म्हैस केवळ मोठी नाही तर तिची किंमतही मोठी आहे. भीम नावाच्या या म्हशीची किंमत तब्बल 24 कोटी आहे. भीम ही तिसऱ्यांदा या मेळ्यात आली आहे. तिला 24 कोटींची बोली लागली आहे, पण त्याच्या मालकाचं म्हणणं आहे की, ती त्यांच्यासाठी अनमोल आहे आणि त्यांनी तिला प्रदर्शनासाठी आणलं आहे, तर मेळ्यात विकण्यासाठी नाही. भीम म्हशीचे मालक जोधपूरचे रहिवासी असलेले जवाहरलाल जांगीड यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमधील एका कुटुंबाने या म्हैशीची किंमत 24 कोटी ठेवली होती. पण त्यांनी भीमला विकण्यास नकार दिला होता. मुर्राह जातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीच भीमला ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच वेळी, त्याला भीमचं वीर्य गुरेढोरे मालकांना पुरवून त्याची जात वाढवायची आहे. हेही वाचा- Girlfriend ला प्रजोप करताना अचानक गेली लाईट, नंतर झालं भलतंच भीमनं अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे जांगीड यांनी सांगितलं की, मी 2018 आणि 2019 मध्ये भीमसोबत पुष्कर मेळ्यात आलो होतो. याशिवाय नागौर, बालोतरा, डेहराडूनसह इतर अनेक ठिकाणी प्राण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. भीमची लांबी 14 फूट आणि रुंदी 6 फूट आहे. तिच्या देखभालीवर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. काय काय खाते भीम भीमचा आहारही आश्‍चर्यकारक आहे, कारण तो सामान्य म्हशीप्रमाणे बाजरी खात नाही, तर तिला 1 किलो तूप, अर्धा किलो लोणी, 200 ग्रॅम मध, 25 लिटर दूध, 1 किलो काजू-बदाम खाऊ घालून निरोगी राहते. 2 वर्षांपूर्वी भीमचे वजन 13 किलो होते, ते आता 1500 किलो झाले आहे. 2018 मध्ये मुराह जातीच्या या भीम म्हशीची किंमत 21 कोटी होती, ती आता 24 कोटी झाली आहे. हेही वाचा- जबरा फॅन! धोनीला भेटण्यासाठी केली 1435 किमी पदयात्रा, माही भेटल्यानंतर त्याला म्हणाला...  मुर्राह जातीच्या म्हशीला जगभरात मोठी मागणी आहे. वीर्यापासून निर्माण झालेल्या म्हशीचे वजन जन्माला येताच 40 ते 50 किलो असते. एका वेळी 20 ते 30 लीटर दूध देते. त्याच्या 0.25 मिली वीर्याची किंमत सुमारे 500 रुपये आहे. पेनच्या रिफिलप्रमाणे स्ट्राँमध्ये 0.25 मिली वीर्य भरले जाते. भीमच्या मालकाचे म्हणणे आहे की, एका वर्षात मी 10 हजार स्ट्रॉ विकतो.
    Published by:Pooja Vichare
    First published: