• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुत्र्याने लहान पिल्लाप्रमाणे पुरवले मांजरीचे लाड; हा क्यूट VIDEO जिंकेल तुमचं मन

कुत्र्याने लहान पिल्लाप्रमाणे पुरवले मांजरीचे लाड; हा क्यूट VIDEO जिंकेल तुमचं मन

या व्हिडिओमधील कुत्रा आणि मांजर यांचं खास बॉन्डिंग दाखवलं गेलं आहे. दोघांचा हा क्यूट व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : आपण अनेकदा असं ऐकलं असेल की मांजर आणि कुत्रा एकमेकांसोबत कधी उभाही राहू शकत नाहीत. अनेकदा तर तुम्ही स्वतःच अशा घटना पाहिल्या असतील. कुत्रा आणि मांजर यांच्यात सतत भांडण सुरु (Dog and Cat Fight) असतं आणि कुत्र्याला पाहताच मांजर धूम ठोकते. मात्र सध्या एका मांजराचा आणि कुत्र्याचा अतिशय क्यूट व्हिडिओ व्हायरल (Cute Viral Video of Dog and Cat) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील त्यांची दुश्मनी पूर्णपणे विसरून जाल. जिंकण्यासाठी चढाओढ! रेस सोडून घोड्यांची रंगली WWF; पाहा जबरदस्त फायटिंगचा VIDEO या व्हिडिओमधील कुत्रा आणि मांजर यांचं खास बॉन्डिंग दाखवलं गेलं आहे. दोघांचा हा क्यूट व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हे दोघं केवळ एकमेकांच्या मित्राप्रमाणेच नाही तर अगदी आई-वडिलांप्रमाणे एकमेकांना जीव लावताना आणि प्रेम करताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा मांजरीच्या शेजारी अतिशय प्रेमाने झोपलेला दिसतो. ते दोघंही केवळ एकमेकांवर प्रेम करतानाच नाही तर सोबत खेळतानाही दिसतात. या व्हिडिओमध्ये दोघांच्याही क्यूट रिअॅक्शनला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. बापरे! 2 महाकाय अजगरांसोबत झोपला तरुण आणि...; खतरनाक VIDEO VIRAL हा व्हिडिओ r/aww नावाच्या रेडिट अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, माझा कुत्रा आणि त्याचं बाळ. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ सर्वांचंच मन जिंकत आहे. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हे दृश्य खरंच फार आकर्षित करणारं आहे, मला हे फार आवडलं. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, इतका क्यूट व्हिडिओ पाहून माझा दिवसच चांगला झाला. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: