मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्रकाराला अटक करण्यासाठी बेलारूसनं पाठवलं थेट लढाऊ विमान

पत्रकाराला अटक करण्यासाठी बेलारूसनं पाठवलं थेट लढाऊ विमान

सरकार विरुद्ध लिहिणाऱ्या एका पत्रकारा  (Journalist)ला अटक करण्यासाठी चक्क लढाऊ विमान पाठवल्याची घटना घडल्यानं जगभरात खळबळ माजली आहे.

सरकार विरुद्ध लिहिणाऱ्या एका पत्रकारा (Journalist)ला अटक करण्यासाठी चक्क लढाऊ विमान पाठवल्याची घटना घडल्यानं जगभरात खळबळ माजली आहे.

सरकार विरुद्ध लिहिणाऱ्या एका पत्रकारा (Journalist)ला अटक करण्यासाठी चक्क लढाऊ विमान पाठवल्याची घटना घडल्यानं जगभरात खळबळ माजली आहे.

मिंस्क, 24 मे: पत्रकारिता (Journalism) हा लोकशाहीचा (Democracy) चौथा खांब मानला जातो. मात्र बेलारूस (Belarus) या देशानं सरकार विरुद्ध लिहिणाऱ्या एका पत्रकाराला अटक करण्यासाठी चक्क लढाऊ विमान पाठवल्याची घटना घडल्यानं जगभरात खळबळ माजली आहे.

बेलारूस सरकारनं रविवारी एका पत्रकाराला अटक करण्यासाठी लढाऊ विमान पाठवून तो प्रवास करत असलेलं विमान जबरदस्तीनं बेलारूसची राजधानी मिंस्क (Minsk) इथल्या विमानतळावर उतरवलं आणि त्याला ताब्यात घेतलं. यानंतर रोमन प्रोटसाविक असं (Roman Protesavich) या पत्रकाराचं नाव आहे. मात्र इथल्या माध्यमांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा पत्रकार प्रवास करत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याची खबर मिळाल्यानं लढाऊ विमान पाठवावं लागलं, असं त्यांनी म्हटलं आहे. युरोपियन देशांनी (Europe) या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली असून बेलारूसनं केलेलं हे कृत्य म्हणजे दहशतवादी घटना (Terrorist Act) असल्याचं म्हटलं आहे.

रायन एअरचे (Rian Air) एक विमान ग्रीसहून (Greece) लिथुआनियाला (Lithuania) जाणार होते. मात्र हे विमान जबरदस्तीनं बेलारूसच्या राजधानीकडे मिंस्कच्या दिशेनं वळवण्यात आलं. यासाठी एमआयजी-29 (MIG-29) लढाऊ विमान (Fighter Plane) पाठविण्यात आलं होतं. या प्रकारामुळे 7 तास उशीरा हे विमान लिथुआनियाला पोहोचले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मिंस्कमध्ये हे विमान उतरवण्यात आल्याबद्दल विमान कंपनीनं अतिशय विचित्र करणं सांगितली.

एका प्रवाशाने सांगितलं की, पत्रकार आणि ब्लॉगर रोमन प्रोटसाविक खूप घाबरले होते. एफपी या वृत्तसंस्थेच्या मते, प्रोटसाविक यांनी आपल्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आल्याचं विमानातील प्रवाशांना सांगितलं होतं.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

26 वर्षीय पत्रकार आणि ब्लॉगर रोमन प्रोटसाविक यांनी काही दिवसांपूर्वी पोलंडची (Poland) न्यूज एजन्सी ‘नेक्स्टा’ साठी (NEXTA) काम केलं होतं. या एजन्सीचे एक टेलीग्राम चॅनेल असून त्याव्यतिरिक्त ट्विटर आणि यूट्यूब चॅनेल देखील आहे. याच एजन्सीनं गेल्या वर्षी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या विरोधातील व्हिडिओ प्रसारीत केले होते. याशिवाय, निवडणुकीदरम्यान सरकारविरोधी बातम्याही प्रसारीत केल्या होत्या. यामुळं रोमन प्रोटसाविक यांच्याविरूद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दंगली भडकवल्याचा देखील आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळं 2019 मध्ये त्यांनी बेलारूस सोडलं. तेव्हा त्यांना दहशतवादी घोषित करण्यात आलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

युरोपीय देशांची नाराजी :

या विमान कंपनीच्या वतीनं अचानक मिंस्क विमानतळावर उतरवण्यात आलेलं विमान आणि उड्डाणाला झालेला विलंब यासाठी सुरक्षिततेचं कारण देण्यात आलं. युरोपियन कौन्सिलचे (European Council) अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी सोमवारी या घटनेवर चर्चा करण्यात येईल, असं म्हटलं आहे. ही अपहरणाची (Kidnapping) घटना असल्याची टीका अनेक युरोपियन नेत्यांनी केली आहे.

First published:

Tags: Airplane, Viral news