मराठी बातम्या /बातम्या /Viral /या बाबांनी जिंकलं नेटकऱ्यांचं मन, मुलगी कामावर सोडतच नाही म्हणून केला असा अनोखा जुगाड

या बाबांनी जिंकलं नेटकऱ्यांचं मन, मुलगी कामावर सोडतच नाही म्हणून केला असा अनोखा जुगाड

Viral Photo: मुलगी आणि वडिलांमधला बाँड खरोखर खूप इमोशनल असतो.

Viral Photo: मुलगी आणि वडिलांमधला बाँड खरोखर खूप इमोशनल असतो.

Viral Photo: मुलगी आणि वडिलांमधला बाँड खरोखर खूप इमोशनल असतो.

बिजिंग, 1 एप्रिल: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो आहे चीनमधील एक डिलीव्हरी बॉयचा. (China news) ली युयानुआन हा आपल्या मुलीला डिलीव्हरी बॉक्स मध्ये ठेऊन काम करतो कारण त्याची मुलगी त्याच्याशिवाय अजिबातच राहत नाही. मुलगी अवघ्या 6 महिन्यांची असल्यापासून तो आपल्या मुलीला स्कूटरवरील डिलीव्हरी बॉक्समध्ये ठेवून शहरातील लोकांपर्यंत सामान पोहचवण्याचं काम करतो.  (Chinese delivery boy carries daughter in box)

चीनचं स्थानिक वृत्तपत्र 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने या डिलिव्हरी मॅनचा एक व्हिडिओ शेअर केला. यात ली युयानुआन आपल्या मुलीला सोबत घेऊन लोकांना त्याचे सामान पोहचवण्याचे काम करताना दिसतो. त्यानं असंही सांगितलं, की त्याची मुलगी 6 महिन्याची असल्यापासूनच त्याच्यासोबत आहे. (China father carries daughter in delivery box)

हेही वाचा सलमानचा एक फोन अन् लागली तरुणींची रांग; अखेर होणार अडीच फुटांच्या तरुणाचं लग्न

मुलीचा बाप झाल्यावर तो आपल्या मुलीला त्याच्यासोबत कामावर घेऊन जात असे. युयानुआनची पत्नी नेहमी एक गादी आणि दुधाची बॉटल डिलीव्हरी बॉक्समध्ये ठेवायची जेणेकरून जेव्हा मुलीला भूक लागेल तेव्हा ती ते दूध पिऊ शकेल. (Chinese delivery boy father and small daughter story)

युयानुआनने सांगितले की त्याची छोटीशी मुलगी पहिल्या दिवसापासूनच आनंदानं त्या बॉक्समध्ये बसली आणि तिच्या हसण्यानं त्याला सतत प्रोत्साहित केलं. ली युयानुआन असंही सांगतो, की तो सकाळी 9 ते 11 या वेळेत तो आपल्या मुलीला सोबत घेऊन कामाला जातो आणि दुपारच्या जेवणाआधी तो आपल्या मुलीला तिच्या आईकडे सोपवतो. ती एका दुकानात काम करते.

हेही वाचा उठ ना रे! बहिणीची आर्त हाक ऐकून पुन्हा जिवंत झाला मृत भाऊ; पाहा चमत्कारिक VIDEO

युयानुआनची मुलगी 5 महिन्याची असताना तिला न्युमोनिया झाला होता. त्यावेळी या दांपत्यानं आपले सर्व बचत केलेले पैसे मुलीच्या उपचारासाठी खर्च केले. 'आयुष्य आता कठीण आहे, पण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. हे सगळं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही खुप कठीण परिस्थितीला सामोरे गेलो आहोत, परंतू यादरम्यान आम्ही खूप चांगल्या आठवणीही तयार केल्या आहेत. मला माझ्या मुलीचं आयुष्य उज्जव बनवायचं आहे असंही युयानुआननं सांगितलं.

First published:

Tags: China, Emotional, Father, Small girl