भिकारी समजून शोरूममधून बाहेर काढलं, त्याच व्यक्तीने विकत घेतली 12 लाखांची बाईक

भिकारी समजून शोरूममधून बाहेर काढलं, त्याच व्यक्तीने विकत घेतली 12 लाखांची बाईक

भिकाऱ्यासारखी अवस्था असलेला तरुण बाईकच्या शोरूममध्ये गाडी खरेदी करण्यासाठी आला. त्यावेळी त्याला कर्मचाऱ्यांनी हाकलून देण्याचा प्रयत्न केला आणि याच माणसानं 12 लाखांची गाडी खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

पटाया, 30 नोव्हेंबर : अनेकदा आपण कपडे पाहून एखाद्या माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावत असतो. परंतु थायलंडमध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत हा किस्सा खरंच घडला असून तो एका महागड्या गाडीच्या शोरूम बाहेर उभा राहून गाड्या पाहत होता. त्यानंतर तो शोरूममध्ये जाऊ लागला असता गार्डने त्याला भिकारी समजून धक्का देऊन बाहेर हाकलून दिले. परंतु त्याच भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने शोरूममधून 12 लाख रुपये किमतीची गाडी खरेदी केली.

थायलंडमधील लुंग डेचा नावाच्या एका व्यक्तीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्या कपड्यांवरून तो भिकारी किंवा मजुरासारखा दिसत आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने 12 लाख रुपये रोख देऊन हार्ले डेव्हिडसन ही गाडी खरेदी केली. लुंग करी यांची अवस्था बघून कुणालाही ते भिकारी असल्याचंच वाटत होतं. त्यामुळे शोरूमधल्या कर्मचाऱ्यांनीदेखील त्यांना भिकारीच समजलं. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं शोरूमच्या बाहेरून निरीक्षण केल्यानंतर त्यांनी शोरूममध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले. तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्याला गाडी खरेदी करायची असल्याचं सांगितलं. पण सेल्समनला हा भिकारी येथून जाणार नाही असं वाटल्याने त्याने त्याला जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-लहान मुलांना एकाच टिफीनमध्ये जेवण देत होती आई; आत निघाले लहान किडे आणि...

आपल्या मतावर ठाम राहत त्यांनी शोरूमच्या मॅनेजरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. लुंग यांच्या हातात एक बॅगदेखील होती. शोरूममधील सर्व जण लुंग यांच्या भोवताली गोळा झाले. सर्वांना ते भिकारी असल्याचं वाटलं. वारंवार ते आपल्याला गाडी विकत घ्यायची असल्याचं म्हणत होते. त्यावेळी तिथले कर्मचारी त्यांची अवस्था पाहून त्यांच्यावर हसत होते. त्यामुळे त्यांनी ओरडून आपल्याला मॅनेजरला भेटायचं असल्याचं सांगितलं.

हा संपूर्ण गोंधळ ऐकून शोरूमचे मालक बाहेर आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना सर्व घटना सांगितली. शोरूमच्या मालकाने देखील त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लुंग यांनी त्यांना आपल्याला गाडी खरेदी करायची असल्याचं सांगितलं. शोरूम मालकाने त्यांना हार्ले डेव्हिडसन दाखवली. या गाडीची किंमत 12 लाख रुपये असल्याचं सांगितलं. त्यानंतर लुंग यांनी आपल्या बॅगेतून 12 लाख रुपये काढले आणि गाडी खरेदी केली. या घटनेनंतर उपस्थित सर्व लोक चकित झाले आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. कुणाच्याही कपड्यांवरून आणि राहणीमानावरून त्याच्या परिस्थितीचा अंदाज न बांधता येऊ शकत नाही हे या घटनेवरून अगदी खरं असल्याचं दिसून आलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 30, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading