मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ATM मुळे झाला कोट्याधीश, पण 3 वर्षात सगळ्याचा नाश... पैसा काय करु शकतो? याचं हे उत्तम उदाहरण

ATM मुळे झाला कोट्याधीश, पण 3 वर्षात सगळ्याचा नाश... पैसा काय करु शकतो? याचं हे उत्तम उदाहरण

डॅन साँडर्स

डॅन साँडर्स

पैसा आयुष्यात श्रीमंती दाखवू शकतो आणि तो आपल्याला विनाश देखील दाखवू शकतो आणि या तरुणाच्या आयुष्यात घडलं आहे. या तरुणाने त्या दोन्ही गोष्टींमधून आयुष्याचा धडा घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 सप्टेंबर : काही लोकांचं नशीब कधी कसं बदलेल हे सांगता येणं कठीण आहे. काही लोकांनी कितीही मेहनत केली तरी त्यांच्या आयुष्यात फारसा काही फरक घडत नाही, पण काही असे लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात अचानक बदल घडून आले आहेत, ज्यामुळे रातोरात त्यांचं आयुष्य बदललं आहे. तुम्हाला कदाचित हे जाणून विश्वास बसणार नाही, परंतू एका एटीएममुळे एका व्यक्तीचं आयुष्य 360 डिग्री बदललं.

खरतंर पैसा आपल्यालाला काहीही करायला लावू शकतो असं म्हणतात ते खरं आहे, तो आपल्याला आयुष्यात श्रीमंती देखील दाखवू शकतो, तसेच पैसा आपल्याला विनाश देखील दाखवू शकतो आणि हे एका तरुणाच्या आयुष्यात घडलं आहे. या तरुणाने त्या दोन्ही गोष्टींमधून आयुष्याचा धडा घेतला. त्याने त्याचा हा संपूर्ण प्रवास आणि अनुभव, पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसोबत देखील शेअर केला आहे.

या तरुणाने सांगितले की तो व्यवसायाने बारटेंडर आहे आणि एटीएमने त्याला करोडो रुपयांचा मालक बनवला आहे. डॅन सॉन्डर्स असे या तरुणाचे नाव आहे.

हे वाचा : 22 व्या वर्षी ड्रिम जॉब, 58 लाखांचा पगार... पण जॉईनिंग आधीच संपलं तरुणाचं आयुष्य

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ऑस्ट्रेलियामध्ये राहाणारा डॅन एक दिवस दारू पिण्यासाठी घराबाहेर पडला होता. यादरम्यान ते एटीएममधून १० हजार रुपये काढण्यासाठी गेला. परंतू एटीएममध्ये ट्रान्सफर करताना व्यवहार रद्द झाल्याचा त्याला मेसेज आला. मात्र तरी देखील एटीएममधून डॅनला पैसे मिळाले. डॅनने पाहिले की त्याला पैसे मिळाले होते, परंतु त्याच्या बँके अकाउंटमधून ते पैसे कट झालेच नाहीत.

त्याच्याजवळील पैसे संपल्यानंतर त्याने पुन्हा त्याच पद्धतीने 67 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. तेव्हा देखील त्याच्या खात्यातील पैसे रद्द झाले नाहीत.

व्यवहार रद्द झाल्यानंतरही पैसे मिळत राहिल्याने बँक खात्यातून पैसे कापले गेले नाहीत आणि या एटीएममधील तांत्रिक बिघाडामुळे घडलं, या सगळ्याचा फायदा घेत त्या व्यक्तीने हळूहळू जवळपास 9 कोटी रुपये आपल्या नावावर केले.

हे वाचा : चोरींनी शिव मंदिरात चोरल्या सोना-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच... पाहा Video

महागड्या पबमध्ये दारू पिण्यापासून ते प्रायव्हेट जेटवर खर्च करण्यापर्यंत हे पैसे डॅनने अवघ्या 5 महिन्यांत ते सगळे पैसे खर्च केले. त्या व्यक्तीला पोलिसांची भीती वाटत होती, त्यामुळे काही वेळाने या प्रकरणाबाबत बँकेशी संपर्क साधला आणि त्यांना या बिघाडाबद्दल सांगितले, मात्र याचा काहीही फायदा झाला नाही.

अखेर 3 वर्षानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. डॅनला चोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले आहे. डॅनला 2016 मध्ये पोलिसांनी सोडून दिलं होतं, मात्र तेव्हा त्याला हे कळून चुकलं होतं की, पैसा काहीही करु शकतो.

या सगळ्यामध्ये डॅन साँडर्सचा सिनेमा बनणार असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे.

First published:

Tags: Marathi news, Top trending, Viral news