मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - दिसायला नाजूक, सुंदर, साधीभोळी; पण हिने गोड हसत जे केलं ते पाहून तोंडात घालाल बोटं

VIDEO - दिसायला नाजूक, सुंदर, साधीभोळी; पण हिने गोड हसत जे केलं ते पाहून तोंडात घालाल बोटं

क्युट तरुणीचं खरं रूप पाहून सर्वजण शॉक.

क्युट तरुणीचं खरं रूप पाहून सर्वजण शॉक.

या क्युट तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 नोव्हेंबर : दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असं म्हणतात. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तरुणीला पाहिल्यानंतर किती नाजूक, सुंदर आणि साधीभोळी आहे असंच तुम्हाला वाटेल. तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य तर कित्येकांच्या हृदयाला भिडलं असेल. पण या तरुणीने जे केलं आहे ते पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. तिचं कतरब पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल.

चेहऱ्यावर क्युट स्माइल देत तरुणीने पुढे आपलं खरं रूप दाखवलं आहे. ते पाहूनच कित्येक जण हादरले आहेत. हिच्या या निरागस चेहऱ्यामागे वेगळंच रूप दडलं आहे. आपलं हे रूप तिने याच व्हिडीओत दाखवलं आहे. त्यामुळे हिला पाहताच क्षणी हिच्या प्रेमात पडलेल्या कित्येकांना जोर का झटकाच बसला असेल.

हे वाचा - ग्रॅज्युएट झाल्यावर मुलगी करतेय कब्रस्तानात नोकरी, महिन्याला मिळतो इतका पगार!

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी हुडी घालून दिसते आहे. सर्वांकडे पाहत की क्युट स्माइल देते. हाय... काय स्माइल आहे, असं म्हणत तुम्हीसुद्धा तिच्या हसण्यावर फिदा व्हाल. असंच हसत हसत ती आपली हुडी काढते आणि हे काय... काय बसला ना तुम्हाला पण जबरदस्त झटका.

जी तरुणी चेहऱ्यावरून नाजूक दिसत होती तिचं शरीर मात्र पिळदार आहे. प्रत्यक्षात ती एक बॉडीबिल्डर आहे. तिची बॉडी इतकी आहे की कित्येक बॉडीबिल्डर्सना ती मात देऊ शकते. तिचे अॅब्ज, डोलेशोले पाहून तर कित्येक तरुणांनाही लाज वाटेल. यासाठी या तरुणीने नक्कीच खूप मेहनत घेतली आहे.

हे वाचा - Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग करते, नवऱ्याला कळलं तेव्हा...

रेडिट या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ओ माय गॉड…ती कितनी क्यूट आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तिच्या चेहऱ्यावरून ती बॉ़डीबिल्डर असावी असं बिलकुल वाटलं नव्हतं, असं बऱ्याच युझर्सनी म्हटलं आहे.

तुम्हाला या तरुणीचा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral videos