नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर अनेक मजेदार आणि हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. काही व्हिडिओ तर असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या असाच अस्वल आणि मांजरीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video of Cat and Bear) झाला आहे. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. व्हिडिओमध्ये दिसतं, की एका मांजरीनं अस्वलाला धूम
ठोकण्यास भाग पाडलं आहे (Bear Ran Away After Afraid of a Cat).
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूचा खेळ, ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO
अनेकदा आपण पाहिलं असेल की लहान प्राणी मोठ्या प्राण्यांना पाहून पळ काढतात. तर काही प्राणी असेही असतात, जे सरळ हल्ला करतात. मात्र, कदाचितच तुम्ही असं कधी पाहिलं असेल की एका मांजराने अस्वलाला घाबरवलं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एका मैदानात मांजर आरामात खेळत आहे. इतक्यात अचानक एक अस्वल तिथे येतं आणि मांजरीला घाबरवण्याचा प्रयत्न करतं. मात्र, मांजरीने केलेला पलटवार सर्वांनाच हैराण करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की पुढे मांजरच अस्वलाला धूम ठोकण्यास भाग पाडते.
Those who win, Are those who think they can... pic.twitter.com/snSmOWoikI
— Susanta Nanda IFS (@susantananda3) November 3, 2021
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की अनेकांनी इतर प्लॅटफॉर्मवरही तो शेअर केला आहे.
अय्यो! पाठीवर काढला बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू, आठ दिवसांतच झाला Breakup
व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्व Susanta Nanda IFS यांच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 30 हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे, तर 2300 हून अधिकांनी लाईक केला आहे. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की आपल्या गल्लीत आता मांजरही सिंह बनली आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की विजय विचारात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cat, Funny video