Home /News /viral /

VIDEO: अचानक कारमध्ये शिरलं अस्वल अन्...; कॅमेऱ्यात कैद झाली थरकाप उडवणारी घटना

VIDEO: अचानक कारमध्ये शिरलं अस्वल अन्...; कॅमेऱ्यात कैद झाली थरकाप उडवणारी घटना

Bear Entered in Car: व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की काही लोक कारमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या कारची खिडकी उघडी आहे. याच दरम्यान त्यांना एक अस्वल तिथे दिसतं.

  नवी दिल्ली 18 डिसेंबर : अस्वल हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. अस्वलाबद्दल असं म्हटलं जातं की ते माणसांना फाडून खातात. अस्वलाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Bear) होत असतात. सध्या अस्वलाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. या व्हिडिओमध्ये अस्वल कारची खिडकी उघडताना दिसत आहे (Bear Entered in Car). दहाव्या मजल्यावर अडकलेल्या मांजरीला वाचवायला गेला व्यक्ती, पण...; Shocking Video व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की काही लोक कारमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या कारची खिडकी उघडी आहे. याच दरम्यान त्यांना एक अस्वल तिथे दिसतं. कार समोर दिसताच अस्वल कारच्या दिशेनं येतं. यानंतर कारमध्ये बसलेले लोक कारची काच बंद करतात. मात्र यानंतर अस्वलाने जे काही केलं, ते अतिशय भीतीदायक होतं.
  View this post on Instagram

  A post shared by ViralHog (@viralhog)

  हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तुम्ही पाहू शकता की अस्वल गाडीजवळ जाऊन उभा राहिलं. कारमध्ये बसलेली एक व्यक्ती अस्वलाचा व्हिडिओ बनवत आहे. या व्यक्तीला जाणवतं की अस्वल कारमध्ये हात घालण्याच्या तयारीत आहे. यानंतर तो लगेचच खिडकीची काच लावतो. यानंतर अस्वल खाली उतरत आणि गाडीचा दरवाजा उघडू लागतं. स्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला; अंगावर काटा आणणारा VIDEO काहीच वेळात अस्वल थेट गाडीमध्ये शिरतं. हे पाहून गाडीतील व्यक्ती इतका घाबरतो की तो आपल्या कॅमेरा गाडीमध्येच टाकून तिथून पळ काढतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर viralhog नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Wild animal

  पुढील बातम्या