मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तक्रार की इन्स्पेक्शन? पोलीस ठाण्यात हजर झाले 3 अस्वल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

तक्रार की इन्स्पेक्शन? पोलीस ठाण्यात हजर झाले 3 अस्वल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

अरे देवा! जंगल सोडून पोलीस ठाण्यात घुसले 3 अस्वल, IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अरे देवा! जंगल सोडून पोलीस ठाण्यात घुसले 3 अस्वल, IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अरे देवा! जंगल सोडून पोलीस ठाण्यात घुसले 3 अस्वल, IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
कनकर, 30 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी पोपट साक्ष देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याची घटना समोर आली होती. अनेकदा पोलीस ठाण्याची पायरी चढायला नको असं म्हटलं जातं. पण एक दोन नाही तर थेट तीन अस्वलांनी पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचं धाडस दाखवलं आहे. आता प्रश्न हा आहे की हे अस्वल नेमके कशासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले असतील? कोण म्हणतंय की प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार करायला तर कोण म्हणतं जंगल सफारी करून कंटाळा आला म्हणून गाठलं असेल पोलीस ठाणं. कारण काय हे मात्र माहीत नाही पण तीन अस्वलांनी पोलीस ठाण्यात जाऊन एक फेरी मारल्याची घटना समोर आली आहे. IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तीन अस्वल पोलीस ठाण्यात शिरली असून फिरताना दिसत आहेत. 3 अस्वल पोलिस ठाण्याच्या आवारात घुसले. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी धैर्य दाखवत त्यांचा सामना केला आहे. तर नागरिकांना सुरक्षित राहण्याची आणि सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे असं कॅप्शन देऊन दिपांशू काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे वाचा-बॉयफ्रेंडसोबत गाताना गायिकेनं केसांना लावली आग; नंतर BF नं काय केलं तुम्हीच पाहा हा व्हिडीओ 7 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 28 डिसेंबरला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओवर खूप भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं तर जंगाल होत असणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असावेत अशी कमेंट केली आहे. तर दुसरा युझर म्हणतो की नाही त्यांचं पोस्टींग असावं. तर तिसरा युझर म्हणतो की कदाचित हे अस्वल इन्स्पेक्शन करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असावेत काय सांगावं. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ छत्तीसगडमधील कनकर पोलीस ठाण्यामधील आहे. एक य़ुझरनं दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील या भागात कायमच अस्वलांचा वावर असतो. त्यामुळे ही घटना घडणं स्वाभाविक होतं. नागरिकांनी मात्र सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Shocking viral video, Viral video.

पुढील बातम्या