मराठी बातम्या /बातम्या /Viral /हात धुवून त्या व्यक्तीच्या मागे लागलं अस्वल; झाडावर चढला तरी सोडलं नाही, शेवटी.., VIDEO

हात धुवून त्या व्यक्तीच्या मागे लागलं अस्वल; झाडावर चढला तरी सोडलं नाही, शेवटी.., VIDEO

व्हायरल होत असलेला हा मजेशीर व्हिडिओ जंगलातील आहे, ज्यामध्ये अस्वलाला पाहून एक व्यक्ती आपला जीव वाचवत झाडाजवळ पोहोचतो. पण अस्वलही धावत जाऊन त्याला पकडतं.

व्हायरल होत असलेला हा मजेशीर व्हिडिओ जंगलातील आहे, ज्यामध्ये अस्वलाला पाहून एक व्यक्ती आपला जीव वाचवत झाडाजवळ पोहोचतो. पण अस्वलही धावत जाऊन त्याला पकडतं.

व्हायरल होत असलेला हा मजेशीर व्हिडिओ जंगलातील आहे, ज्यामध्ये अस्वलाला पाहून एक व्यक्ती आपला जीव वाचवत झाडाजवळ पोहोचतो. पण अस्वलही धावत जाऊन त्याला पकडतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 21 जानेवारी : वन्यजीवांशी संबंधित हजारो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यातील बहुतेक व्हिडिओमध्ये दोन प्राण्यांमधील लढाई पाहायला मिळते आणि काहीवेळा या व्हिडिओंमध्ये प्राण्यांमधील प्रेम आणि काळजीही पाहायला मिळते. पण आज आम्ही तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. हा व्हिडिओ अस्वलाचा आहे, हे अस्वल एका व्यक्तीच्या मागे लागल्याचं दिसून येतं.

बापरे! हिंमत पाहूनच व्हाल शॉक, मगरीवर बसून दुचाकी चालवताना दिसला व्यक्ती, पुढे काय झालं पाहा..VIDEO

व्हायरल होत असलेला हा मजेशीर व्हिडिओ जंगलातील आहे, ज्यामध्ये अस्वलाला पाहून एक व्यक्ती आपला जीव वाचवत झाडाजवळ पोहोचतो. पण अस्वलही धावत जाऊन त्याला पकडतं. यानंतर अस्वलापासून वाचण्यासाठी हा व्यक्ती झाडावर चढतो. मात्र, एवढं करुनही अस्वल शांत बसत नाही आणि ते या व्यक्तीसोबत झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागतं. हे करत असताना अस्वल सतत या व्यक्तीचा पाय ओढण्याचाही प्रयत्न करत राहातं.

हा व्हिडीओ तुम्ही कितीही वेळा बघितला तरी तुम्ही खळखळून हसाल. मात्र, संकटात सापडलेल्या या माणसाची अवस्था पाहता अस्वलाच्या या हल्ल्यामुळे त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर Armin neekbin नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

समुद्रातील लाटांसोबत वाहत गेला व्यक्ती; मृत्यूच्या दारात पोहोचलेला असतानाच 'देवदूत' आला, Shocking Video

हा व्हिडिओ थरकाप उडवणाराही आहे आणि तितकाच मजेशीरही आहे. याच कारणामुळे आतापर्यंत 94 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media