मराठी बातम्या /बातम्या /Viral /जैसलमेरच्या महोत्सवात तीन फूट लांब मिशी असलेली `ही` व्यक्ती चर्चेत; दाढी-मिशी सेटिंगसाठी रोज लागतात दोन तास

जैसलमेरच्या महोत्सवात तीन फूट लांब मिशी असलेली `ही` व्यक्ती चर्चेत; दाढी-मिशी सेटिंगसाठी रोज लागतात दोन तास

जैसलमेरच्या महोत्सवात तीन फूट लांब मिशी असलेली `ही` व्यक्ती चर्चेत

जैसलमेरच्या महोत्सवात तीन फूट लांब मिशी असलेली `ही` व्यक्ती चर्चेत

दाढी-मिशांमुळे आज दोन तरुण सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. हे दोघंही सध्या जैसलमेरच्या मरू महोत्सवात `मिस्टर डेझर्ट` बनण्यासाठी दाखल झाले आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    जैसलमेर, 04 फेब्रुवारी : छंद ही मोठी गोष्ट आहे, असं म्हणतात. हाच छंद जर सन्मान वाढवणारा ठरला तर? राजस्थानमधील दोन तरुणांसोबत असंच काहीसं घडलं आहे. या दोन्ही तरुणांनी छंद, आवड म्हणून दाढी-मिशी वाढवली. पण आज तीच त्यांची शान बनली आहे. या दोघांकडे आता अनेक कार्यक्रमांची शान म्हणून पाहिलं जातं. नागौर येथील रमेश कुमार आणि सीकर येथील श्याम सिंह अशी या तरुणांची नावं आहेत. दाढी-मिशांमुळे आज ते सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. हे दोघंही सध्या जैसलमेरच्या मरू महोत्सवात `मिस्टर डेझर्ट` बनण्यासाठी दाखल झाले आहेत.

    बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटात त्यांच्या तोंडी `मूंछें हो तो नत्थूलाल जैसी,` असा एक संवाद आहे. पण या दोघांच्या मिशा पाहिल्यावर तुमच्या तोंडून फक्त यांचे नाव निघेल. कदाचित तुम्ही या दोघांना पाहिल्यानंतर मिशा असाव्यात तर श्याम सिंह आणि रमेश कुमारसारख्या असं म्हणाल. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की, रमेश कुमार यांना मिशा सेट करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. नागौरचे रहिवासी असलेले रमेश कुमार सध्या रामदेवरा येथे धर्मशाळेचे व्यवस्थापक म्हणून काम करतात. ``या मिशांसाठी मी फक्त मुलतानी मातीचा वापर करतो. या मातीमुळे मिशा चमकदार दिसतात आणि मुलायम होतात. या सेट करण्यासाठी मला रोज दिड ते दोन तासांचा अवधी लागतो. या लांबसडक मिशांमुळे मात्र ताक, रबडीसारखी पेय पिताना अडचण निर्माण होते. असं असतानाही मी 2017 पासून मिशा राखल्या आहेत आणि आता माझ्या मिशांची लांबी तीन फूट झाली आहे,`` असं रमेश कुमार यांनी सांगितलं.

    हेही वाचा - Bill gates यांची चपाती पाहून PM Narendra Modi नासुद्धा आवरलं नाही; VIDEO पाहताच म्हणाले...

    मिशांसाठी घ्यावी लागते मेहनत

    सीकर येथील श्याम सिंह यांच्या मिशा सुमारे अडीच फूट आहेत. ``मला दाढी आणि मिशा सेट करण्यासाठी रोज एक तास द्यावा लागतो. मिशांसाठी मी मुलतानी माती सह आवळा आणि मोहरीचं तेल वापरतो. यामुळे केसांची चमक कायम राहते. दाढी असो वा मिशी या दोन्ही गोष्टी एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळाव्या लागतात. दाढी -मिशा राखणारी ही माझी तिसरी पिढी आहे,`` असं त्यांनी सांगितलं.

    मिशांना लावतो मुलतानी माती

    जैसलमेर येथील मरु महोत्सवात मिस्टर डेसर्ड बनण्यासाठी बाडमेर, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, पाली, सीकर आणि नागौरसह राज्यभरातून स्पर्धक दाखल झाले आहेत. पाली येथील गणपत सिंह हे मिस्टर डेसर्ड ठरले. ते आवड्यातून एकदा मुलतानी माती आणि ताकाने दाढी धुवून काढतात. तसेच दाढीला शाम्पू आणि कंडिशनर लावतात. याशिवाय दाढी चमकदार आणि मुलायम होण्यासाठी आवळा आणि मोहरीचे तेल वापरतात.

    First published:

    Tags: Local18, Viral