• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • याला म्हणतात जिद्द! न थांबता इवल्याशा पक्षानं 239 तासात पार केलं 13000 किलोमीटर अंतर

याला म्हणतात जिद्द! न थांबता इवल्याशा पक्षानं 239 तासात पार केलं 13000 किलोमीटर अंतर

या पक्षाने 239 तासात 13000 किलोमीटर अंतर पार केलं आहे (Longest Continual Flight by Land Bird). विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : मागील वर्षी आपण एका वाघाची कहाणी नक्कीच ऐकली असेल. जो आपल्या जोडीदाराच्या आणि परिसराच्या शोधात हजारो किलोमीटर पायी चालत गेला. सध्या अशाच एका पक्षाचा किस्सा समोर आला आहे. यात या पक्षाने 239 तासात 13000 किलोमीटर अंतर पार केलं आहे (Longest Continual Flight by Land Bird). कुत्र्याने लहान पिल्लाप्रमाणे पुरवले मांजरीचे लाड; हा VIDEO जिंकेल तुमचं मन विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ही पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं, की एका Bar-tailed Godwit ने न थांबता आणि आराम न करता 13000 किलोमीटर प्रवास केला (Bar-tailed Godwit's Longest Journey) . या पक्षाने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. आपल्या या जिद्दीसोबतच पक्षाने स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला आहे, कारण याआधी इतक्या दूरपर्यंत न थांबता कोणत्याही पक्षाने प्रवास केलेला नाही. या पक्षाचे फोटो Geoff White/Adrien Riegen ने कॅप्चर केले आहेत. ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकाचा नको तो प्रताप; 'त्या' अवस्थेत पाहून विद्यार्थीही शॉक या पक्षाची ही जिद्द आणि मेहनत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एका यूजरनं या पक्षाचं कौतुक करत लिहिलं, माहिती नव्हतं की पक्षी आराम न करता इतकं अंतर कापू शकतात आणि सलग उडू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत पक्षाचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: