Home /News /viral /

तब्बल 20 वर्षे महिलेच्या पोटात दुखत होते, एक्स-रे करताच समोर आले विचित्र कारण

तब्बल 20 वर्षे महिलेच्या पोटात दुखत होते, एक्स-रे करताच समोर आले विचित्र कारण

stomach pain

stomach pain

बांगलादेशमध्ये 55 वर्षीय राहणारी बचेना खातून (Bachena Khatun) ही महिला सध्या चर्चेत आहे. गेले 20 वर्षे झाले तिच्या पोटात दुखत होते. असह्य वेदना होत होत्या. पोटोचा एक्स रे केले असता समोर विचित्र कारण आले. ते पाहून डॉक्टरही झाले चकित.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 16 जानेवारी: वैद्यकीय उपचारावेळी करण्यात आलेला दुर्लक्षपणा कधी कधी फारच धोकादायक ठरतो. याचा प्रत्यय बांग्लादेशमध्ये आला. तब्बल 20 वर्षे पोटात दुखत होते. पोटात जास्त दुखू लागल्याने महिला रुग्णालयात गेली. तिथे तिचे चेकअप करण्यात आले. यावेळी महिलेच्या पोटाचा एक्स-रे करण्यात आला. यावेळी एक्स-रे मध्ये जे दिसले ते पाहून महिलेसह डॉक्टरही झाले चकित. बांगलादेशमध्ये 55 वर्षीय राहणारी बचेना खातून (Bachena Khatun) ही महिला सध्या चर्चेत आहे. गेले 20 वर्षे झाले तिच्या पोटात दुखत होते. असह्य वेदना होत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये बांगलादेशातील चौडंगा येथे शस्त्रक्रिया केली तेव्हा पित्त मूत्राशयाचा स्टोन आढळला. महिलेने तिच्या ऑपरेशनसाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. मात्र हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर दोन दिवसांनी तिच्या पोटात पुन्हा दुखू लागले. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला लक्ष न देण्यास सांगितले.

  20 वर्ष पोटात असह्य वेदना होत होत्या

  20 वर्ष पोटात असह्य वेदना महिला सहन(Bangladeshi Woman Stomach Pain for 20 years) करत राहिली. अनेक डॉक्टरांशी तिने संपर्क साधला. अनेकांनी उपचार केले पण दुखण्याचे नेमकं कारण मिळाले नाही. रुग्णालायच्या खर्चासाठी तिने गाय, संपत्ती सगळे विकले पण काहीच उपयोग झाला नाही. त्रास सहन न झाल्याने ती एका डॉक्टरकडे गेली त्यांनी तिला एक्स रे काढण्यात सांगितले.

  एक्स-रेमध्ये धक्कादायक बाब दिसली

  एक्स-रेमध्ये जे काही दिसले ते खूपच आश्चर्यकारक होते. बचेनाच्या एक्स रे मध्ये एक कात्री (X-ray Found Scissors in Woman's Stomach) दिसून आली जी तिच्या पोटात गेल्या 20 वर्षांपासून होती. हे पाहून डॉक्टरही चकित झाले. 20 वर्षांपूर्वीच्या ऑपरेशनबद्दल त्यांनी डॉक्टरांना सांगितले तेव्हा ते डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचे त्यांना समजले. गेल्या सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातील कात्री काढण्यात आली. आता ती बरी होत आहे. आता त्याच रुग्णालयात तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती असा निष्काळजीपणा कसा झाला, याचा शोध घेत आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Viral, Viral news

  पुढील बातम्या