• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हस्तमैथून करताना टाळ्यात अडकला प्रायव्हेट पार्ट; तब्बल 2 आठवडे वेदना केल्या सहन, शेवटी...

हस्तमैथून करताना टाळ्यात अडकला प्रायव्हेट पार्ट; तब्बल 2 आठवडे वेदना केल्या सहन, शेवटी...

तब्बल दोन आठवडे तरुणाने याबाबत कोणालाच सांगितलं नाही, शेवटी आयुष्यभरासाठी त्याच्यावर भयावह वेळ आली.

 • Share this:
  थायलँडची राजधानी बँकॉकमधून एक विक्षिप्त प्रकार समोर आला आहे. येथील एका 38 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट टाळ्यात अडकला. ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. या व्यक्तीने तब्बल दोन आठवडे वेदना सहन केल्यानंतर आपल्या आईला याबाबत सांगितलं. त्याची आई आपल्या मुलाला तातडीने रुग्णालयात घेऊन गेली. येथे डॉक्टरांनी ऑपरेट करीत त्याची सुटका केली. मात्र टाळं हटविण्यात उशिर झाला होता. आता व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कायमच निकामी झाला आहे. (Bangkok Man's Penis Gets Stuck in Padlock) अद्याप या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती सिंगल आहे आणि आपल्या आईसोबत राहते. व्यक्तीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा एकटेपणाला कंटाळला होता. कोरोना महासाथीत तो घराच्या बाहेर जातही नव्हता. म्हणून तो तणावात होता. त्यामुळे तो टाळ्यातून हस्तमैथून करीत होता. यापूर्वीही अनेकदा त्याने टाळ्यातून हस्तमैथून केलं आहे. मात्र हा प्रकार घडल्यानंतर लाजेने त्याने कोणालाच याबद्दल सांगितलं नाही. मात्र दोन आठवड्यांपर्यंत प्रायव्हेट पार्ट टाळ्यात अडकल्यामुळे संक्रमण वाढलं होतं. आणि त्याला शेवटी रुग्णालयात हलविण्यात आलं. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना इलेक्ट्रिक कटरसारख्या उपकरणाने टाळं कापावं लागलं. हे ही वाचा- VIDEO: मनोरुग्णाचा बसस्थानकात अर्धनग्नावस्थेत धिंगाणा, महिला प्रवाशांची तारांबळ या व्यक्तीवर तब्बल अर्धा तास शस्त्रक्रिया सुरू होती. मात्र यादरम्यान व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट जखमी झाला होता आणि आता कायमच निकामी झाला. अद्यापही व्यक्तीवर संक्रमणासाठी उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाला अजूनही वेदना आहेत. मात्र पेन किलर देऊन त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: