तब्बल 85 लाखांच केळ, विकत घेतलं एकाने खाल्लं दुसऱ्याने त्यानंतर...

तब्बल 85 लाखांच केळ, विकत घेतलं एकाने खाल्लं दुसऱ्याने त्यानंतर...

एका फ्रेंच व्यक्तीने शोमधील केळ 85 लाख रुपयांना विकत घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हेच केळं एका कलाकाराने कोणाच्या लक्षात येण्याआधीच खाऊन फस्त केलं.

  • Share this:

मियामी, 09 डिसेंबर : दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक केळाची कलाकृती व्हायरल झाली होती. त्याची किंमतही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 85 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्यावर झालेल्या आर्ट बेझल शोमध्ये एका कलाकाराने केळ भिंतीवर चिकटले होते. त्याला एका फ्रेंच व्यक्तीने 85 लाख रुपयांना विकत घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हेच केळं एका कलाकाराने कोणाच्या लक्षात येण्याआधीच खाऊन फस्त केलं. प्रदर्शनातील एवढं महागडं केळ खाल्ल्यानं मोठा गोंधळ उडाला पण आयोजकांनीही हा प्रकार जास्त मनावर न घेता त्या केळ खाणाऱ्या कलाकाराला शो सोडण्यास सांगितलं.

इटालियान कलाकाराने शोमध्ये कॉमेडियन नावाने कलाकृती मांडली होती. पॅरिसियन आर्ट गॅलरीचे मालक इमॅन्युले पॅरोटीनं यांनी, “केळं हे जागतिक व्यापार आणि विनोदबुद्धीचे प्रतीक आहे. म्हणून या कलाकृतीला 'कॉमेडियन' असे नाव देण्यात आले आहे. पॅरोटीनने फेसबुकवर लिहिले आहे की, 'या केळाच्या तुकड्यांची किंमत ही त्या वस्तुला दिलेले महत्त्व ठरवते”. तसेच, पॅरोटीन यांनी, “कॅटेलन आपल्या हॉटेलच्या खोलीत एक शिल्प बनवण्याचा विचार करीत होता, जे त्याला नेहमी प्रेरणा देईल. त्यांनी प्रथम तांब्याच्या पेंटसह पेंट केलेले तांबे आणि केळी तयार केली. यानंतर, खऱ्या केळीसारखा त्याला टेप लावून चिटकवले”, असे सांगितले होते.

दरम्यान, या शोमध्ये लोकांनी गर्दी केली होती. सगळे इतर कलाकृती पाहण्यात दंग असतानाच डेव्हिड डेट्युना या कलाकाराने कोणाच्या लक्षात येण्याआधीच भिंतीवर लावलेले केळ काढून खाल्ले. तेव्हा आयोजकांनाही काय करावं आणि काय नको असं झालं.

केळ खाल्ल्यानंतर डेव्हिडला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, एका कलाकाराची कलाकृती आणि एक भुकेसाठी व्याकूळ झालेला कलाकार. केळ खुपच चविष्ट आहे आणि ते भिंतीवर लावणाऱ्याचे धन्यवाद! असं म्हणून तो निघून गेला.

आता 85 लाखांचे केळ खाल्ल्यावर त्याला एखाद्याने चोप दिला असता पण ही एक कॉमेडियन कलाकृती होती. इतर केळांसारखंच ते एक केळ होतं असं म्हणत आयोजकांनी यावर पडदा टाकला.

Published by: Suraj Yadav
First published: December 9, 2019, 10:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading