मुंबई 24 जानेवारी : स्वयंपाक करणं ही खरं तर ही एक कला आहे. महिलांसह अनेक पुरुष या कलेत निपुण असतात. स्वयंपाक करताना गॅस, इलेक्ट्रिक वस्तूंशी संपर्क येत असल्याने पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं असतं. सोशल मीडियावर आपण निरनिराळे पदार्थ बनवण्याचे, स्ट्रीट फूड विक्रेत्यांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो; मात्र सध्या सोशल मीडियावर स्वयंपाकाशी संबंधित एक वेगळा आणि काळजी वाढवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्वयंपाक करताना भाजणं, कापणं या घटना नेहमीच घडतात; पण एका व्यक्तीने भाजीला फोडणी देताना थेट आग लागल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळते. ही घटना नेमकी कशी घडते, ते जाणून घेऊ या.
स्वयंपाक करणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. जेव्हा नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर राहावं लागतं, तेव्हा अनेकांना या गोष्टीची जाणीव होते. डाळ-भात कोणीही बनवू शकतं; पण जेव्हा चपाती लाटायची वेळ येते तेव्हा बरेच जण वैतागून जातात.
हे ही पाहा : हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल
भाजी करताना फोडणी अंगावर उडून चटका बसतो. असं होऊनसुद्धा जेवणासाठी कोणताही पर्याय नसल्याने हा त्रास सहन केला जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भाजीला फोडणी अर्थात तडका देत असताना आग लागल्याचं दिसतं.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरच्या flurtingboy या पेजवरून सप्टेंबर महिन्यात शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज , 85 हजार लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. 'भाजीला फोडणी देण्याची पद्धत कशी असते ते या भावाला विचारा, एकदम मस्त पद्धत आहे, खूप मजा येईल, तुम्हाला हसू आवरणार नाही,' असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत एक व्यक्ती गॅसवर एका भांड्यात गरम तेलात फोडणीचा मसाला तयार करत आहे. त्यानंतर ही फोडणी तो पातेल्यात घालतो. फोडणी पातेल्यात घालताच आग भडकते आणि त्यामुळे या व्यक्तीसह बाजूच्या व्यक्तीही घाबरून दूर होतात. त्यानंतर ती व्यक्ती प्रसंगावधान राखून पातेल्याचं झाकण बंद करते. हा प्रकार पाहून सर्व जण हसत असल्याचं दिसतं.
या व्हिडिओवर शेकडो युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. 'हॉस्टेलमधला एक सामान्य दिवस' अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. 'या खेळात आर्थिक जोखीम आहे आणि याची सवय होऊ शकते. तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक तरुण घाबरून गेले आहेत. कारण डाळ, भाजीला फोडणी देताना ते खूप काळजी घेतात, जेणेकरून चुकूनही गरम तेलाचे शिंतोडे त्यांच्या अंगावर येऊ नयेत.' अशी कमेंट अन्य एका युझरने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Top trending, Videos viral, Viral