मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्याशा डुकरांची धडपड; हृदयस्पर्शी VIDEO VIRAL

पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्याशा डुकरांची धडपड; हृदयस्पर्शी VIDEO VIRAL

कोरोनाच्या परिस्थितीत माणसातील माणुसकी हरवल्याचं चित्रं अनेक ठिकाणी दिसलं. हा व्हिडीओ पाहून तरी ती जिवंत होईल अशी आशा आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत माणसातील माणुसकी हरवल्याचं चित्रं अनेक ठिकाणी दिसलं. हा व्हिडीओ पाहून तरी ती जिवंत होईल अशी आशा आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत माणसातील माणुसकी हरवल्याचं चित्रं अनेक ठिकाणी दिसलं. हा व्हिडीओ पाहून तरी ती जिवंत होईल अशी आशा आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 ऑगस्ट : सध्या कोरोनाच्या परिस्थितीत आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे की रक्ताच्या माणसांनीही कोरोना रुग्णांकडे पाठ फिरवली. आपल्या मृत कोरोनाग्रस्त नातेवाईकावर अंत्यसंस्कारालाही कुणी पुढे येत नव्हतं. माणसांमधील माणुसकी इथं हरवताना दिसली. यात माणुसकीला जागं करणारा असा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल होत आहे.

डुकराच्या (Pig) छोट्याशा असा पिल्लांची जमिनीवर तडफडणाऱ्या माशाला (Fish) वाचवण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचा हा व्हिडीओ आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या अकरा सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. मात्र हा व्हिडीओ काळजाला भिडणारा आहे.

व्हिडीओत आपण पाहू शकतो एक मासा पाण्याबाहेर जमिनीवर पडला आहे. या माशाला पाण्याबाहेर पाहून त्याच्या बचावासाठी डुकराची पिल्लं धावून येतात. त्या माशाला पाण्यात नेण्यासाठी प्रयत्न करतात. हे छोटे छोटे डुक्कर एकत्र येत आपल्या तोंडाने त्या माशाला हळूहळू ढकलत नेतात आणि अखेर त्याला पाण्यात पोहोचवतात.

हे वाचा - दोन वाघांमध्ये झाली WWF, पाहा दुर्मीळ लढाईचा VIDEO

या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटलं, "माणसांमधील माणुसकी संपली आहे, आता पशुपक्ष्यांमधील या माणुसकीचं उदाहरण द्यावं लागतं". तर एका युझरने म्हटलं, "मासा मृत असो किंवा जिवंत मात्र डुकराच्या पिल्लांनी खूप चांगलं काम केलं आहे. अगदी माणसंही जीवनमृत्यूशी झुंज देणाऱ्या एखाद्या जखमीला पाहून तसंच सोडून जातात"

प्राण्यांमधील प्रेम, दयाळूपणा सातत्याने दिसून आला आहे. याआधीदेखील अशा कित्येक प्राण्यांचे इतरांना मदत करतानाचे व्हिडीओ व्हायलरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भविष्यात प्राणी माणसांपेक्षादेखील अधिक समजूतदार होतील, असा विश्वास एका युझरने व्यक्त केला आहे.

हे वाचा - उडी मारून बसला पाठीवर...व्हेल माशावरून तरुणानं केली सफर, पाहा VIDEO

खरंच हा व्हिडीओ म्हणजे सध्या कोरोना काळात रक्ताची नाती विसरलेल्या, आपल्या माणसांना विसरलेल्या आणि माणुसकी विसरलेल्यांसाठी एक मोठी चपराक आहे. किमान हा व्हिडीओ पाहून तरी माणसातील माणुसकी पुन्हा जिवंत होईल अशी आशा आहे.

First published:

Tags: Social media viral, Viral videos